ते अतिक्रमण काढा, तलाठ्याला जातिवाचक शिवीगाळ करीत गंभीर मारहाण, बीडमध्ये मोठा राडा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बीडमध्ये जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीडच्या वडवणी शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना केल्याचा राग धरून अतिक्रमणधारकांनी तलाठी गंगाराम वडमारे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.
वडवणी शहरातील या प्रकरणात तलाठ्याच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे आणि जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वडवणी शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली होती. वडवणीचे तहसीलदार वैभव महेंद्रीकर यांनी वडवणीचे तलाठी आणि इतर दोन तलाठ्यांना संबंधित अतिक्रमण धारकांना आपले साहित्य काढून घेण्याच्या सूचना द्या असे सांगितले होते. त्यावरून तलाठी गंगाराम वडमारे, खोसे आणि काळे हे अतिक्रमण ठिकाणी जाऊन त्यांनी अतिक्रमण धारक बिलाल कुरेशी यांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या.
advertisement
बिलाल कुरेशी आणि त्यांच्या साथीदारांनी तलाठी वडमारे यांना तू आमचे अतिक्रमण काढणार का? असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात बिलाल कुरेशी आणि त्यांच्या आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 4:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ते अतिक्रमण काढा, तलाठ्याला जातिवाचक शिवीगाळ करीत गंभीर मारहाण, बीडमध्ये मोठा राडा









