आई झोपताच साधला डाव, नराधमाने चिमुकलीला रेल्वे स्थानकावरून उचललं अन्.., बीडला हादरवणारी घटना

Last Updated:

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका ३१ वर्षीय नराधमाने ६ वर्षीय मुलीवर विकृतीचा कळस गाठला आहे.

hingoli crime
hingoli crime
परळी: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका ३१ वर्षीय नराधमाने ६ वर्षीय मुलीवर विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं पीडित मुलीला रेल्वे स्थानकावरून उचलून घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सज्जात अल्लाबक्ष शेख असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. त्याने ३१ ऑगस्ट रोजी ६ वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचं कुटुंब हे मुळचं पंढरपूर येथील रहिवासी आहे. ते कामाच्या शोधात रेल्वेनं परळीत आले होते. राहण्याची सोय नसल्याने ते परळी रेल्वे स्थानकावरच थांबले होते.
रात्री उशिरा पीडित मुलगी आपल्या आईजवळ खेळत होती. याचवेळी मुलीच्या आईला अचानक झोप लागली. याच संधीचा फायदा घेत संशयित सज्जात अल्लाबक्ष शेख याने घेतला. त्याने चिमुकलीला उचलून बाजूच्या कंपाऊंडजवळ नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सज्जातला ताब्यात घेतले.
advertisement
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी उद्या (३ सप्टेंबर) परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
आई झोपताच साधला डाव, नराधमाने चिमुकलीला रेल्वे स्थानकावरून उचललं अन्.., बीडला हादरवणारी घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement