मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ८७ उमेदवारांच्या नावांची घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Congress First candidates list For BMC Election: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक - २०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केल्यानंतर पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ८७ जणांना स्थान देण्यात आले आहे. ज्या जागांवर कोणताही तिढा नाही, अशा जागांवरील उमेदवार काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहेत.
मुंबई महानगर पालिकेत पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेससोबत युती केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या पुढाकाराने वंचितसोबत बसून आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. रविवारी आघाडीची घोषणा झाल्यावर मुंबई काँग्रेस नेत्यांनी एकत्र बसून उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून शिक्कामोर्तब केले.

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी
advertisement

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी
advertisement

काँग्रेसची पहिली यादी
आमदार अस्लम शेख आणि खासदार हंडोरे यांच्या मुलाला उमेदवारी
काँग्रेस पक्षाच्या यादीत दोन नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावांचा समावेश आहे. खासदार चंद्रकांत हंडोरे यांची लेक प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग क्रमांक १४० मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आमदार अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
सोमवारी रात्री उशिरा काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता
सोमवारी रात्री एबी फॉर्म देऊन मंगळवारी काँग्रेसचे उमेदवार अर्ज दाखल करतील. काँग्रेसची दुसरी उमेदवारी रात्री सोमवारी रात्री प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 5:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ८७ उमेदवारांच्या नावांची घोषणा









