Mazagon Dock Apprentice: माझगाव डॉकमध्ये नोकरीची संधी, इंजिनियरिंग आणि डिप्लोमा उत्तीर्णांसाठी भरती; शिकाऊ नोकरीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mazagondock.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
इंजिनियरिंग आणि डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. जर तुमच्याकडे इंजिनियरिंगची पदवी किंवा इंजिनियरिंगच्या डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुमचीं सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mazagondock.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 05 जानेवारी पर्यंत करण्यात आली आहे.
पदवीधर अप्रेंटिसशिप साठी आणि डिप्लोमा अप्रेंटिसशिप साठी नोकरभरती वेगवेगळी होणार आहे. पण पदे सारखे होणार आहेत. सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी/Naval Architecture, B.Com, BCA, BBA आणि BSW अशा वेगवेगळ्या पदांसाठी तरूणांची नोकरभरती होणार आहे. पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी 170 पदे आहेत, तर डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी 30 पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. एकूण 200 पदांवर नोकरभरती केली जाणार आहे. ही भरती तांत्रिक आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक उत्तम संधी आहे, विशेषतः भारतीय नौदल, जहाज बांधणी आणि उत्पादन क्षेत्रात रस असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.
advertisement
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 01 मार्च 2026 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत पूर्ण हवे. SC/ST उमेदवारांना वयामध्ये 05 वर्षांची सूट आणि OBC उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे. अर्जदारांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अर्जदाराला फॉर्म भरण्यासाठी फी नसणार आहे. प्रत्येक अर्जदाराला फी नसेल. दरम्यान, पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी 12,300 रूपये इतका पगार असेल तर, डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी 10,900 रूपये इतका पगार असेल. इच्छुक उमेदवारांनी एक व्यवस्थित जाहिरातीची PDF वाचूनच मग अर्ज करायचा आहे. आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत, आपली शैक्षणिक पात्रता जुळते का, अशी सर्व माहिती अर्जदारांनी व्यवस्थित पाहून अर्ज भरायचाय.
advertisement
ऑनलाईन अर्जासाठी लिंक- https://mazagondock.in/app/mdlapprentice/Login.aspx
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mazagon Dock Apprentice: माझगाव डॉकमध्ये नोकरीची संधी, इंजिनियरिंग आणि डिप्लोमा उत्तीर्णांसाठी भरती; शिकाऊ नोकरीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात










