Goa Boat Accident : मुंबईनंतर आता गोव्यातही बोट पलटली, महाराष्ट्रातल्या खेडचे 13 प्रवासी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबईतल्या बोट अपघाताची घटना ताजी असतानाच आता गोव्यामध्येही बोटीचा अपघात झाला आहे. उत्तर गोव्याच्या कलंगुट्टे बिचवर ही बोट पलटली आहे, ज्यात एका प्रवाशचा मृत्यू झाला आहे तर 20 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
पणजी : मुंबईतल्या बोट अपघाताची घटना ताजी असतानाच आता गोव्यामध्येही बोटीचा अपघात झाला आहे. उत्तर गोव्याच्या कलंगुट्टे बिचवर ही बोट पलटली आहे, ज्यात एका प्रवाशचा मृत्यू झाला आहे तर 20 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृत्यू झालेल्या माणसाचं वय 54 वर्ष होतं. तर अपघातात जखमी झालेल्या 20 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
बोटीतून जाणाऱ्या 2 प्रवाशांशिवाय इतर सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातली होती. बोटीतल्या प्रवाशांमध्ये 6 वर्षांच्या लहान मुलांपासून ते महिलाही होत्या, असं दृष्टी मरीनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. समुद्र किनाऱ्यापासून 60 मीटर अंतरावर ही बोट पलटली आहे.
या बोटीमध्ये महाराष्ट्रातल्या खेडचे 13 प्रवासी होते. बोट समुद्रात पलटी होत असल्याचं दिसताच दृष्टी मरीनचे प्रतिनिधी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दृष्टी मरीनच्या 18 जीव रक्षकांनी बोटीवर अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवले आणि त्यांना समुद्र किनाऱ्यावर सुरक्षित आणलं. यानंतर जखमींना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
जखमी झालेल्या 20 प्रवाशांमध्ये 6 आणि 7 वर्षांची दोन मुलं आहेत. तर 25 आणि 55 वर्षांच्या दोन महिला आहेत. बोटीवर असलेल्या दोन व्यक्तींनी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोवा हे लोकप्रिय ठिकाण आहे. संपूर्ण देशच नाही तर परदेशातूनही पर्यटक गोव्यामध्ये येतात, पण ऐन सणासुदीच्या वेळी हा अपघात झाल्यामुळे पुन्हा एकदा बोटींच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागच्याच बुधवारी मुंबईमध्ये नील कमल ही प्रवासी बोट बुडाली होती, ज्यात 15 जणांना जीव गमवावा लागला होता.
Location :
Goa
First Published :
Dec 25, 2024 8:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Goa Boat Accident : मुंबईनंतर आता गोव्यातही बोट पलटली, महाराष्ट्रातल्या खेडचे 13 प्रवासी









