advertisement

IPL 2026 : भारतीय खेळाडूने टाकला आयपीएलमधला फास्टेस्ट बॉल, ध्रुव जुरेलची बॅटही थरथरली!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये सगळ्यात जलद बॉल टाकण्याचा विक्रम भारतीय फास्ट बॉलरच्या नावावर नोंदवला गेला आहे

भारतीय खेळाडूने टाकला आयपीएलमधला फास्टेस्ट बॉल, ध्रुव जुरेलची बॅटही थरथरली!
भारतीय खेळाडूने टाकला आयपीएलमधला फास्टेस्ट बॉल, ध्रुव जुरेलची बॅटही थरथरली!
अहमदाबाद : आयपीएल 2026 मध्ये सगळ्यात जलद बॉल टाकण्याचा विक्रम भारतीय फास्ट बॉलरच्या नावावर नोंदवला गेला आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यात अहमदाबादच्या स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात हा विक्रम नोंदवला गेला आहे. गुजरातचा फास्ट बॉलर अशोक शर्मा याने 154.2 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला, यंदाच्या आयपीएलमधला हा सगळ्यात जलद बॉल होता.
पंजाब किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही अशोक शर्माने त्याच्या वेगाची झलक दाखवली होती, पण राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अशोकने त्याचा वेग आणखी वाढवला. अशोक शर्माने सुरूवातीलाच 145 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला आणि पूर्ण स्पेलमध्ये त्याने हाच वेग कायम ठेवला. पण खरा धमाका 16व्या ओव्हरमध्ये झाला जेव्हा ओव्हरचा शेवटचा बॉल त्याने 154.2 किमी प्रती तासाच्या वेगाने टाकला. ध्रुव जुरेल अशोक शर्माच्या या यॉर्करवर कसाबसा वाचला.
advertisement
अशोक शर्मा आयपीएल इतिहासात 154 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉलिंग करणाऱ्या भारतीय बॉलरच्या खास लिस्टमध्ये जाऊन पोहोचला आहे. अशोकच्या आधी उमरान मलिक आणि मयंक यादव यांनी हा विक्रम केला आहे. उमरान मलिक आयपीएल इतिहासात सगळ्यात जलद बॉल टाकणारा भारतीय बॉलर आहे, जेव्हा तो सनरायजर्स हैदराबादच्या टीममध्ये होता.

आयपीएलमधले सगळ्यात फास्ट बॉल

advertisement
• शॉन टेट- 157.7 KMPH
• लॉकी फर्ग्यूसन- 157.3 KMPH
• उमरान मलिक- 157.00 KMPH
• मयंक यादव- 156.7 KMPH
• मयंक यादव- 155.8 KMPH
• एनरिक नॉर्किया- 156.2 KMPH

कोण आहे अशोक शर्मा?

23 वर्षांचा अशोक शर्मा राजस्थानचा राहणारा आहे आणि तिथूनच स्थानिक क्रिकेट खेळतो. करियरच्या सुरूवातीला अशोकची लाईन ऍण्ड लेन्थ व्यवस्थित नव्हती, पण मागच्या 2 वर्षांत तो उत्कृष्ट बॉलर म्हणून समोर आला आहे. अशोकने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत राजस्थानसाठी 10 सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या. अशोकने आतापर्यंत 4 प्रथम श्रेणी, 7 लिस्ट ए आणि 12 टी-20 सामने खेळले आहेत, यात त्याला 14 प्रथम श्रेणी, 13 लिस्ट ए आणि 24 टी-20 विकेट मिळाल्या आहेत.
advertisement
अशोक शर्मा आयपीएलमध्ये केकेआर आणि राजस्थानच्या टीममध्ये होता, पण गुजरातच्या टीममधून त्याला पदार्पणाची संधी मिळाली. गुजरातने अशोक शर्माला 90 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : भारतीय खेळाडूने टाकला आयपीएलमधला फास्टेस्ट बॉल, ध्रुव जुरेलची बॅटही थरथरली!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement