advertisement

IPL ची अनटोल्ड स्टोरी... 7 कोटींचे 65 लाख झाले, प्लेइंग इलेव्हनमध्ये येताच इमोशनल, Video

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने माघार घेतली. स्नायूंच्या दुखापतीमुळे शुभमन गिल या सामन्यात खेळला नाही.

IPL ची अनटोल्ड स्टोरी... 7 कोटींचे 65 लाख झाले, प्लेइंग इलेव्हनमध्ये येताच इमोशनल, Video
IPL ची अनटोल्ड स्टोरी... 7 कोटींचे 65 लाख झाले, प्लेइंग इलेव्हनमध्ये येताच इमोशनल, Video
अहमदाबाद : आयपीएल 2026 मध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने माघार घेतली. स्नायूंच्या दुखापतीमुळे शुभमन गिल या सामन्यात खेळला नाही. गिलच्या गैरहजेरीमध्ये राशिद खानकडे गुजरातच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं, तर गिलऐवजी 21 वर्षांच्या कुमार कुशाग्रला खेळण्याची संधी मिळाली. कुमार कुशाग्रचा गुजरातकडून हा पहिलाच सामना होता.
गुजरात आणि राजस्थान यांच्यातल्या सामन्याच्या टॉसआधी पदार्पण करणाऱ्या कुमार कुशाग्रला गुजरातच्या टीमची कॅप देण्यात आली तेव्हा कुशाग्र इमोशनल झाला आणि त्याने कॅपचं चुंबन घेतलं. कुमार कुशाग्रची बॅटिंग पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया गुजरातचा कर्णधार राशिद खानने दिली.
राजस्थानने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना कुमार कुशाग्र साई सुदर्शनसोबत ओपनिंगला आला, पण 14 बॉलमध्ये 18 रन करून तो माघारी परतला. रियान परागच्या बॉलिंगवर शिमरन हेटमायरने कुमार कुशाग्रचा कॅच पकडला.
advertisement

कोण आहे कुमार कुशाग्र?

कुमार कुशाग्र हा झारखंडचा विकेट कीपर बॅटर आहे. आयपीएल 2025 मध्ये गुजरातने कुमार कुशाग्रला 65 लाख रुपयांना विकत घेतलं. आयपीएल 2024 मध्ये कुमार दिल्लीच्या टीममध्ये होता. दिल्लीने कुमारला आयपीएल लिलावात तब्बल 7.2 कोटी रुपये देऊन विकत घेतलं, पण संपूर्ण मोसमात त्याची कामगिरी निराशाजनक झाली. 2024 मध्ये दिल्लीकडून खेळताना कुमार कुशाग्रने 3 इनिंगमध्ये फक्त 3 रन केल्या, त्यानंतर दिल्लीने त्याला रिलीज केलं.
advertisement

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाका

2025 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कुमार कुशाग्रने धमाका केला. कुमार कुशाग्र त्या मोसमात झारखंडचा सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू होता. कुमारने 10 इनिंगमध्ये 4 अर्धशतकांसह 422 रन केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये कुमारने फक्त 38 बॉलमध्ये 81 रनची खेळी केली होती. तर कर्णधार इशान किशनने 49 बॉलमध्ये 101 रन केल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL ची अनटोल्ड स्टोरी... 7 कोटींचे 65 लाख झाले, प्लेइंग इलेव्हनमध्ये येताच इमोशनल, Video
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement