मुंबईच्या वधूचा नाशिकच्या रिसॉर्टवर मृत्यू, हळद लागायच्या आधीच अनर्थ, आठवडाभर आधीही त्याच रिसॉर्टवर घडलं भयंकर

Last Updated:

नाशिकमधील एका आलिशान रिसॉर्टवर मुंबईच्या वधूचा मृत्यू झाला आहे. हळदीला काही तास उरले असताना अचानक तिचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Ai generated Photo
Ai generated Photo
नाशिकमधील आलिशान रिसॉर्टवर लग्नाचे सनई-चौघडे वाजत होते. जिथे काही तासांतच बोहल्यावर चढण्याची तयारी सुरू होती. पाहुणे गोळा झाले होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण हे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण क्षणात दु:खात बदललं आहे. इथं हळदीच्या दिवशीच २९ वर्षीय वधूचा मृत्यू झाला आहे. आसपास पाहुणे मंडळी असताना अचानक वधू जमीनीवर कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. ज्या रिसॉर्टवर ही घटना घडली, तिथेच आठवडाभर आधी एका अन्य वधू पित्याचा देखील मृत्यू झाला होता.
ही धक्कादायक घटना घडल्यानंतर नातेवाईकांचा एकच आक्रोश बघायला मिळाला आहे. दीपशीखा गिरीश गोडबोले असं मृत पावलेल्या वधूचं नाव आहे. ती मुंबईतील दादर-माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ राहते. दीपशीखा यांचा विवाह नाशिकमधील गंगापूर जवळील एका रिसॉर्टमध्ये ठरला होता. यासाठी संपूर्ण गोडबोले कुटुंब आणि वऱ्हाडी नाशिकमध्ये दाखल झाले होते. शनिवारी रात्री संगीत सोहळा उत्साहात पार पडला, दीपशीखा यांच्या हातावर मेहंदीही सजली होती. मात्र, रविवारी सकाळी लग्नाच्या विधींची तयारी सुरू असताना अचानक अनर्थ घडला.
advertisement
सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास रिसॉर्टमधील खोली क्रमांक २०१ मध्ये नातेवाईकांसोबत असताना दीपशीखा अचानक चक्कर येऊन पडल्या. त्यांच्या आत्या डॉ. स्वाती बापट यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना श्रीगुरूजी रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दगदग जीवावर बेतली?

मिळालेल्या माहितीनुसार, दीपशीखा यांना लग्नाच्या मुहूर्तासाठी तयार होत असताना थोडे अस्वस्थ वाटत होते. आदल्या रात्रीचे जागरण, लग्नातील धावपळ आणि दगदग यामुळे हे होत असावे, असा समज करून त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, हीच अस्वस्थता त्यांच्या जीवावर बेतली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
advertisement

दुर्दैवी योगायोगाची चर्चा

या घटनेनंतर एक धक्कादायक योगायोग समोर आला आहे. ज्या रिसॉर्टमध्ये ही घटना घडली, त्याच ठिकाणी अवघ्या आठवडाभरापूर्वी एका वधूपित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. आता त्याच ठिकाणी हळदीच्या दिवशी वधूचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईच्या वधूचा नाशिकच्या रिसॉर्टवर मृत्यू, हळद लागायच्या आधीच अनर्थ, आठवडाभर आधीही त्याच रिसॉर्टवर घडलं भयंकर
Next Article
advertisement
Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु
  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

View All
advertisement