दिवसभर राबला; पण शेवटची विश्रांतीही मिळाली नाही, बीडमधील ऊसतोड कामगाराचा वाटेतच हृदयद्रावक शेवट

Last Updated:

ऊसतोड मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मजुराचा मृत्यू 
मजुराचा मृत्यू 
बीड : गेवराई–माजलगाव मार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत ऊसतोड मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
राजुरी मळा येथील रहिवासी एकनाथ पवार (वय 40) हे उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीचे काम करत होते. शुक्रवारी दिवसभर कष्टाचे काम आटोपून सायंकाळी ते पायी आपल्या घरी परतत होते. गेवराई–माजलगाव रस्त्यालगत ते चालत असताना गेवराईकडून माजलगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. अचानक झालेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली.
advertisement
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, एकनाथ पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्यावरच त्यांनी प्राण सोडल्याने उपस्थित नागरिकांनी शोक व्यक्त केला. अपघातानंतर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र पवार यांचे प्राण वाचवणे शक्य झाले नाही.
advertisement
या अपघातात दुचाकीस्वार तुषार चंद्रकांत जगताप (वय 25, रा. शेलू मारफळा) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच तलवाडा बीटचे अंमलदार अंजन गडदे आणि चालक पवन शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण आणि वेगाची माहिती तपासातून स्पष्ट केली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/बीड/
दिवसभर राबला; पण शेवटची विश्रांतीही मिळाली नाही, बीडमधील ऊसतोड कामगाराचा वाटेतच हृदयद्रावक शेवट
Next Article
advertisement
Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु
  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

View All
advertisement