नागपुरच्या नेहरुनगरमध्ये दोन गटात झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले आहे. ही वादाची ठिणगी लग्नसमारंभातच झाली होती. मारवाडी चौकातून परतणाऱ्या गटाला नेहरुनगर पुतळ्याजवळ अडवून हाणामारी केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. दोन गटातील 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.



