advertisement

BMC: किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेत्या पदावर निवड, कोणत्या समित्यांवर कोण अध्यक्ष? या नावांची चर्चा

Last Updated:

किशोरी पेडणेकर यांच्या रुपाने मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेते पद एका महिलेकडे आले आहे.

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर
सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाने रितू तावडे यांना संधी दिल्यानंतर पाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करून 'महिलाराज'वर शिक्कामोर्तब केले. सोमवारी दुपारी किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यभार स्वीकारला.
विरोधी पक्ष नेते पदाची पद्धत २००० सालापासून पालिकेत सुरू झाल्यापासून केवळ पुरुषच हे पद भूषवत होते. परंतु किशोरी पेडणेकर यांच्या रुपाने मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेते पद एका महिलेकडे आले आहे. शिवसेना-भाजपच्या सत्ताकाळात हे पद काँग्रेसकडे जायचे. मात्र भाजप-शिंदेसेनेच्या सत्ताकाळात विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या सेनेकडे गेले आहे.

महापौरपद, गटनेतेपदाची जबाबदारी आणि आता विरोधी पक्षनेतेपदही पेडणेकरांकडे!

advertisement
किशोरी पेडणेकर यांनी सेनेच्या सत्ताकाळात महापौरपद भूषवले. नंतर लगेचच पक्षाने त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. हा देखील योगायोग इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर शिवसेनेच्या गटनेतेपदाची देखील जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून आता अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement

कोणत्या समित्यांवर कुणाच्या नावाची चर्चा?

स्थायी समिती: भाजप पक्ष कडून अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे आणि हरीश बंगिर्दे यांची नावे चर्चेत असून यापैकी निवड होण्याची शक्यता
शिक्षण समिती: भाजपकडून राजेश्री शिरोडकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस असल्याचे बोलले जाते
सुधार समिती : शिवसेनाकडून संध्या दोषी यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता
advertisement
बेस्ट समिती: शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता
भारतीय जनता पक्षामार्फत स्थायी समिती सदस्य
१. गणेश दत्ताराम खणकर
२. प्रभाकर शिंदे
३. राखी हरिश्चंद्र जाधव
४. अॅड. मकरंद सुरेश नार्वेकर
५. हरिष भांदिर्गे
६. शिवकुमार वासुकीनाथ झा
७. शितल सुरेश गंभीर
८. प्रकाश यशवंत दरेकर
९. प्रिती मनोज सातम
advertisement
१०. तिवाना ताजिंदरसिंग सतनामसिंग
सुधार समिती सदस्य
१. प्रकाश काशिनाथ गंगाधरे
२. अलका सुभाष केरकर
३. शर्मा चंदन चित्तरंजन
४. महादेव शंकर शिवगण
५. दिपक (बाळा) तावडे
६. स्वप्ना विरेंद्र म्हात्रे
७. अनिष नवल मकवानी
८. तेजस्वी अभिषेक घोसाळकर
९. साक्षी दिपक दळवी
१०. संदिप दिलीप पटेल
शिवसेना
१. अमेय अरुण घोले
advertisement
२. संध्या विपुल दोशी (सक्रे)
३. किरण (भाऊ) लांडगे
४. अजित बाळकृष्ण रावराणे
शिवसेना ठाकरे
१)मिलिंद वैद्य
२) उर्मिला पांचाळ
३) सचिन पडवळ
४) राजेंद्र रावत
५) विशाखा राऊत
६) हितेंद्र बडवे
७) लोकरे
काँग्रेस
१) अशरफ आझमी,
MIM
२) शहाबाज आतिफ शेख
मनसे
१) सुप्रिया दळवी
शिक्षण समिती सदस्य
१. राजेश्री राजेश शिरवडकर
२. स्वप्ना विरेंद्र म्हात्रे
advertisement
३. सुषम गोपाळ सावंत
४. शिवानंद (शिवा) शेट्टी
५. योगिता सुनिल कोळी
६. डॉ. नील किरीट सोमैया
७. रोहन शशिन्द्र राठोड
८. पिल्ले श्रीकला रामचंद्रन
९. राजपूत विक्रम प्रतापसिंह
विद्युत पुरवठा व परिवहन समिती सदस्य
१. आकाश राज के. पुरोहित
२. सुनिल गणाचार्य
३. संतोष मेढेकर
४. अजय सिंग
५. प्रमोद एकनाथ वाकोडे
६. रमाकांत गुप्ता
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC: किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेत्या पदावर निवड, कोणत्या समित्यांवर कोण अध्यक्ष? या नावांची चर्चा
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement