मृत्यूचं भय इथे संपतं! 'त्या' यंत्राचं न सुटलेलं कोडं, काशी विश्वनाथ मंदिरातील 11 रहस्य; तुम्हालाही करतील थक्क
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्थित काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र नसून ते गूढ आध्यात्मिक रहस्यांचे केंद्र आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती काशीत शेवटचा श्वास घेतो, त्याला प्रत्यक्ष महादेव तारक मंत्र देऊन मोक्ष प्रदान करतात.
Kashi Vishwanath Temple Secrets : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्थित काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र नसून ते गूढ आध्यात्मिक रहस्यांचे केंद्र आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती काशीत शेवटचा श्वास घेतो, त्याला प्रत्यक्ष महादेव तारक मंत्र देऊन मोक्ष प्रदान करतात. या प्राचीन मंदिराशी जोडलेली 11 न ऐकलेली आणि रोचक रहस्ये जाणून घेऊयात.
शिव आणि शक्तीचा अद्वितीय संयोजन
काशी विश्वनाथ हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे शिव आणि शक्ती एकत्र नांदतात. येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने केवळ शिवाचीच नाही, तर शक्तीचीही कृपा प्राप्त होते. हे मंदिर आत्मिक शांती आणि उर्जेचे महास्त्रोत मानले जाते. ही दुर्मिळ गोष्ट या मंदिराला इतर तीर्थक्षेत्रांपासून वेगळे ठरवते.
उजवी बाजू आणि देवी भगवतीचे रहस्य
सामान्यतः शिवालयांमध्ये माता पार्वती शंकराच्या डाव्या बाजूला विराजमान असते. मात्र, काशी विश्वनाथ मंदिरात माता भगवती शंकराच्या उजव्या बाजूला विराजमान आहे. या विशिष्ट स्थितीमुळेच या मंदिराला 'मुक्तीचे द्वार' मानले जाते.
advertisement
गर्भगृहाच्या वरील श्री यंत्राचे रहस्य
मंदिराच्या गर्भगृहाचे छत आणि घुमट यांच्या रचनेत एक अत्यंत प्रभावी 'श्री यंत्र' स्थापित करण्यात आले आहे. हे यंत्र तंत्रशास्त्रात अत्यंत शक्तिशाली मानले जाते, जे संपूर्ण मंदिरातील ऊर्जेला संतुलित ठेवते. पण नेमकं कस हे अजूनही कोणाला उलगडता आलेलं नाही.
शृंगारच्या वेळी पश्चिम मुखी मूर्ती
मंदिरातील मूर्तींचे तोंड हे नैसर्गिकरित्या ठराविक दिशेला असते, पण जेव्हा भगवान शिवाची शृंगार आरती होते, तेव्हा सर्व मूर्तींचे मुख पश्चिमेकडे असते. हे दृश्य अत्यंत दुर्मिळ आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
advertisement
चार प्रमुख द्वारांचे आध्यात्मिक महत्त्व
काशी विश्वनाथ मंदिराला चार मुख्य द्वारे आहेत. शांती द्वार, कला द्वार, प्रतिष्ठा द्वार आणि निवृत्ती द्वार. या चारही द्वारांचा संबंध मानवी जीवनातील चार पुरुषार्थांशी म्हणजेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष जोडलेला आहे.
ईशान्य कोपऱ्यात ज्योतिर्लिंगाचे रहस्य
वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातो. काशी विश्वनाथचे मुख्य ज्योतिर्लिंग हे मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थित आहे, ज्यामुळे या ठिकाणची सकारात्मकता कित्येक पटीने वाढते.
advertisement
मुख्य द्वार दक्षिण मुखी आणि अघोर दर्शन
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे. तंत्र शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची मानली जाते, पण शिव स्वतः काळाचेही काळ असल्याने, इथून प्रवेश केल्याने मृत्यूचे भय संपते आणि भक्ताला 'अघोर' रूपाचे दर्शन घडते.
त्रिशूल रचनेवर स्थित काशी
पौराणिक मान्यतेनुसार, संपूर्ण काशी शहर हे भौगोलिक जमिनीवर नसून भगवान शिवाच्या त्रिशूलावर वसलेले आहे. प्रलय काळातही काशी नष्ट होणार नाही, असे शिवपुराणात नमूद केले आहे.
advertisement
गुरु आणि राजा दोन्ही स्वरूप
काशीमध्ये भगवान शिव केवळ देव नाहीत, तर ते तिथले 'राजा' आणि 'गुरु' देखील आहेत. संपूर्ण शहराची व्यवस्था आणि न्याय शिवाद्वारेच चालतो, अशी वाराणसीच्या लोकांची श्रद्धा आहे.
प्रतिज्ञाबद्ध शिव आणि अन्नपूर्णा
असे म्हटले जाते की, भगवान शिवाने माता अन्नपूर्णेकडे भिक्षा मागितली होती की, काशीत कोणीही उपाशी झोपणार नाही. आजही काशीत माता अन्नपूर्णा आणि शिव भक्तांच्या पोटाची काळजी घेतात, अशी धारणा आहे.
advertisement
अघोर दर्शन आणि सामूहिक भक्ती
येथे शिवाची पूजा करण्यासाठी कोणतेही भेदभाव पाळले जात नाहीत. 'अघोर' मार्गाने जाणारे साधू असोत किंवा सामान्य भक्त, प्रत्येकजण एकाच भक्तीच्या प्रवाहात वाहतो. येथील सामूहिक आरतीचा नाद ब्रह्मांडीय ऊर्जेची अनुभूती देतो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 5:14 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
मृत्यूचं भय इथे संपतं! 'त्या' यंत्राचं न सुटलेलं कोडं, काशी विश्वनाथ मंदिरातील 11 रहस्य; तुम्हालाही करतील थक्क








