advertisement

Thane Traffic Alert : ठाणेकरांनो पुढचे सहा तास 'हे' दोन रस्ते राहणार बंद, कारण…

Last Updated:

ठाणे पश्चिममधील ब्रम्हांड जंक्शन, मुल्लाबाग बस डेपोजवळ आणि घोडबंदर रोडवर महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

News18
News18
ठाणे: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरू आहेत. त्यामुळे ठाणेकरांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. आता अशातच ठाणे पश्चिमेतील कासारवडवली वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये, आज मध्यरात्री 23.55 वाजेपासून उद्या सकाळी 06.00 वाजेपर्यंत वाहतूक बंदी असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या मार्गावर प्रवास करणार असाल तर एकदा प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा.
ब्रम्हांड जंक्शन, मुल्लाबाग बस डेपोजवळ, घोडबंदर रोड येथे फुटपाथ लगत दोन्ही बाजुच्या पिलरचे काम करण्यात येणार आहे. त्यावर 48 मिटर लांब, 3. 80 मिटर रुंद आणि 4 मीटर उंच लोखंडी गर्डर लाँच करण्याचे ठरवले आहे. हे काम, आज रात्री (7 एप्रिल) 23.55 मिनिटांपासून ते उद्या पहाटे (8 एप्रिल) 06.00 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित होणे सामान्य नागरिकांच्या जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे.
advertisement
बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग कोणते?
घोडबंदर ठाणे वाहिनी ब्रम्हांड सिग्नल कडून मानपाडा कापुरबावडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रम्हांड सिग्नलववर 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. तर, ब्रम्हांड सिग्नलकडून कापुरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रम्हांड सिग्नलपासून डावीकडे वळून ब्रम्हांड सर्कल मार्गे आझादनगर रोडने लोढा अमारा समोरील चौकातून कोलशेत ढोकळी रोडने उजवीकडे वळून कापुरबावडी मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.
advertisement
ठाणे घोडबंदर वाहिनीवर मानपाड्याच्या एमजी मोटर्स शोरुमजवळ आणि मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा ब्रिजच्या चढणीवर 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. ठाणे घोडबंदर रोडने येणारे सर्व वाहनांना मानपाडा ब्रिजच्या बाजुच्या स्लीप रोडने नागोरी टी स्टॉल येथून डावीकडे वळून टिकुजीनी वाडी सर्कल वरुन उजवीकडे वळून वेरिएंट निळकंठ ग्रीन समोरील रोडने मुल्लाबाग कट येथुन इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.
advertisement
advertisement
बंद मार्ग कोणते आणि पर्यायी मार्ग कोणते हे व्यवस्थित पाहूनच ठाणेकरांनी आज रात्री प्रवास करायचा आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Traffic Alert : ठाणेकरांनो पुढचे सहा तास 'हे' दोन रस्ते राहणार बंद, कारण…
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement