Nanded Triple Murder: 'तेरा लाडला लौटेगा जरूर'... गुंड शाहरुखचं नांदेड पोलिसांना थेट चँलेज, फरार झाल्यानंतर टाकली इन्स्टा स्टोरी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Nanded Triple Murder: नांदेड पोलिसांची अब्रू वेशीवर टांगत एका फरार गुंडाने इंस्टाग्राम आयडीवर स्टोरी अपलोड करत थेट पोलिसांना चॅलेंज दिले आहे.
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड : नांदेडमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांची हत्या झाल्याची थरारक घटना घडली आहे. तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झासे आहे. गुन्हेगारी वर्चस्वाच्य वादातून झालेल्य हल्ल्यात दोन गुंडाचा जागेवर मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात घुसून पोलीसांसामोर ठार करण्यात आले. त्यानंतर 48 तासात आणखी दोन खून झाले. तीन दिवसात पाच खून झाल्याने नांदेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. सध्या फरार आरोपींची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. दरम्यान नांदेड पोलिसांची अब्रू वेशीवर टांगत एका फरार गुंडाने इंस्टाग्राम आयडीवर स्टोरी अपलोड करत थेट पोलिसांना चॅलेंज दिले आहे.
advertisement
शुक्रवारी रात्री नांदेड शहरातील डी मार्टजवळ सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये टोळीयुद्ध झाले. यात सदा गँगचा अर्जित सिंघ चव्हाण आणि साई लाला गँगचा मोहम्मद अरबाज जागीच ठार झाले. तर साई लाला गँगचा सय्यद आवेझ याला शासकीय रुग्णालयात मयत अर्जित सिंघ चव्हाण याचा भाऊ प्रदिप चव्हाण याने खंजीरने वार करून ठार केले. या गँगवार मध्ये सहभागी असलेला शेख शाहरुख उर्फ शाहरुख कबुतर हा फरार आहे.
advertisement
शाहरूखने कोणासाठी ठेवली स्टोरी?
शुक्रवारी रात्रीच्या गँगवॉरमध्ये तो सहभागी होता, त्या हल्यात तो जखमी झाला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून फरार आरोपी शाहरुख कबुतर याचा शोध सुरु आहे. मात्र तो पोलिसाना सापडला नाही. उलट फरार असताना शाहरुख कबुतर हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. आज चार तासापूर्वी त्याने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर स्टोरी अपलोड केली. एक स्टोरी त्याने कदाचित आपल्या प्रेयसीसाठी ठेवली तर दुसरी स्टोरी त्याने आपल्या आईसाठी ठेवली आहे.
advertisement
शाहरुख कबुतर नाव कसं पडलं?
आईसाठी ठेवलेल्या स्टोरीमध्ये त्याने बस मेरी माँ को संभाल लेना तुम , बहोत परेशान हो जायेगी वो , तेरा लाडला लौटेगा जरूर , तू रोना मत , असं गाण शाहरुख कबुतर याने इंस्टाग्रामवर स्टोरीवर अपलोड केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख कबूतर हा सराईत गुन्हेगार आहे . गुन्हा करून तो कबुतरासारखा उडून जातो , कुणाला सापडत नाही , म्हणून त्याचं नाव शाहरुख कबुतर आहे असं त्याचे पंटर सांगत आहेत.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded Triple Murder: 'तेरा लाडला लौटेगा जरूर'... गुंड शाहरुखचं नांदेड पोलिसांना थेट चँलेज, फरार झाल्यानंतर टाकली इन्स्टा स्टोरी









