Budget 2024 : निवडणुकीच्या नावानं चांगभलं, अजितदादांकडून आतापर्यंत कोणत्या घोषणा? महत्त्वाचे मुद्दे

Last Updated:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज घोषित करण्यात आली. या योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतील

अजितदादांकडून घोषणा
अजितदादांकडून घोषणा
मुंबई : महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. विधिमंडळात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट मांडलं आहे. संत तुकारामांचा अभंग सादर करत त्यांनी बजेट मांडण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, की विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या आहेत. ही हजारो वर्षांची परंपरा आहे.भक्तिमार्गाची नाळ जोडल्याची जाणीव महाराष्ट्राला आहे. त्यामुळे युनेस्कोकडे याची नोंद व्हावी म्हणून प्रस्ताव पाठवत आहोत.
अजित पवार म्हणाले, देहू आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील सर्व वारकऱ्यांची तपासणी केली जाणार आहे.पालखी महामार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यावर 76 हजार कोटींच्या वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे. केंद्राचं असंच भक्कम पाठबळ राज्याला लागेल अशी अपेक्षा बाळगतो.
अजितदादांकडून आतापर्यंत कोणत्या घोषणा?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आज घोषित करण्यात आली. या योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतील. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटींची तरतूद केली जाईल. जुलै 2024 पासून योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
advertisement
ई रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 80 कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार
सामुदायिक विवाहात 10 हजारांवरून 25 हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय
जुन्या रुग्णवाहिकांऐवजी नव्या रुग्णवाहिका देणार
हर घर जल, योजनेत नळ जोडण्या केल्या जाणार
स्वयंपाकघरात स्वच्छ इंधनासाठी एलपीजी पुरवठा वाढवण्याची गरज असल्याचं सांगत प्रत्येक पात्र कुटुंबाला 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजना घोषणा.
advertisement
अंगणवाडी सेविका यांना 1 लाख रुपयांचा लाभ देण्यात येत आहे.
बचत गटांच्या निधीच्या रक्कमेत 15 हजारांहून 40 हजार रुपये करण्यात येत आहे
या वर्षात 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा उपक्रम
पर्यटन क्षेत्रात 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जाचा परतावा करण्यासाठी योजना
100 जलदगती अत्यावश्यक न्यायालयांसाठी निधी देणार
8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या मुलींना शिक्षणात 100 टक्के प्रतिपूर्ती करणार
advertisement
स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी या अंतर्गत नमो शेतकरी निधी, एक रुपयांत पीक विमा देणार
नैसर्गिक नुकसानभरपाई म्हणून 22 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. 24 लाख शेतकऱ्यांना मदत दिली आहे
गाव तिथे गोदाम योजना यासाठी नवे गोदाम निर्मिती करताना जुन्या गोदामांची डागडुजी केली जाणार.त्यासाठी ३४१ कोटींच्या निधीची तरतूद केली जात आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Budget 2024 : निवडणुकीच्या नावानं चांगभलं, अजितदादांकडून आतापर्यंत कोणत्या घोषणा? महत्त्वाचे मुद्दे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement