advertisement

वंचित गैरहजर-MIM तटस्थ, संगीता खांडेकर एका मताने कशा जिंकल्या? चंद्रपुरात गेम कसा फिरला?

Last Updated:

Chandrapur Mahanagarpalika Mayor Election: चंद्रपूर महानगरपालिकेत अखेर महापौरपदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार संगीता खांडेकर अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत.

News18
News18
Chandrapur Mahanagarpalika Mayor Election: चंद्रपूर महानगरपालिकेत अखेर महापौरपदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार संगीता खांडेकर अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे चंद्रपुरात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांची इथं सहज सत्ता येईल, अशी स्थिती होती, मात्र असं असताना चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एक मताने विजयी झाल्या आहेत.

चंद्रपूरात नेमका गेम कसा फिरला?

६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या होत्या. इथं काँग्रेस आणि शेकापनं एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे शेकापच्या ३ नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा होता. अशात काँग्रेसला स्वत:चा महापौर करण्यासाठी अवघ्या ४ नगरसेवकांची गरज होती. अशात इथं ठाकरे गटाचे सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे ठाकरे गटाला सोबत घेतलं तर बहुमताचा आकडा सहज क्रॉस होत होता. पण ठाकरे गट आणि वंचितने स्वतंत्र गट स्थापन करत महापौर पदाची मागणी केली. जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, अशी थेट भूमिका ठाकरे गटाने घेतली.
advertisement
तसेच काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलहामुळे काँग्रेसचे २७ नगरसेवक शेवटपर्यंत एकत्र येऊ शकले नाहीत. काँग्रेसमधील याच अंतर्गत वादाचा फायदा भाजपनं घेतला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सत्तेत वाटा देत युती जुळवून आणली. ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा देताच बहुमताचा आकडा भाजपच्या बाजुने झुकला.
advertisement
ठाकरेंनी पाठिंबा दिला असला तरी भाजप अद्याप बहुमतापासून दूर होतं. अशात एमआयएम आणि वंचितने भाजपला पडद्याआडून मदत केली. वंचितचे दोन नगरसेवक महापौरपदाच्या निवडीला गैरहजर राहिले. तर एमआयएमचा नगरसेवक तटस्थ राहिला. अशा स्थितीत बहुमताचा आकडा ३४ वरुन ३२ वर आला. परिणामी भाजपच्या संगीता खांडेकर एका मताने विजयी झाल्या. त्यांना ३२ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मतं मिळाली.
advertisement

चंद्रपूर महानगरपालिका निकाल २०२६ (एकूण जागा: ६६)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)२७
भारतीय जनता पक्ष (BJP)२३
शिवसेना (UBT)०६
शेतकरी कामगार पक्ष (PWP)०३
वंचित बहुजन आघाडी (VBA)०२
अपक्ष (Independents)०२
(MIM, BSP, SHS-शिंदे)प्रत्येकी १
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वंचित गैरहजर-MIM तटस्थ, संगीता खांडेकर एका मताने कशा जिंकल्या? चंद्रपुरात गेम कसा फिरला?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement