सडक्या थर्माकोलवर बसून शाळेला जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ, Video पाहून वाटेल भीती

Last Updated:

शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांवर आली आहे.

+
शिक्षणासाठी

शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास, विद्यार्थी सडक्या थर्माकोलवर बसून जातात शाळेला, Video

छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. असं असताना देशामधील काही भागांमध्ये परिस्थिती फार बिकट आहे. लोकांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नसल्याचं चित्र काही ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील भिवधानोराच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेला जावं लागतंय. सडक्या थर्माकोलवर बसून नदीतून वाट काढत त्यांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
देशातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील भिवधानोरा गावातील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावं लागत आहे. गंगापूर तालुक्यात असलेल्या भिवधानोरा गावातील ही परिस्थिती आहे. गावाला लागून जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर आहे. या बॅकवॉटरच्या एक किलोमीटर अंतरावर गावातील विद्यार्थ्यांसाठी शाळा आहे. मात्र जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. गावातील पहिली ते बारावीचे 15 विद्यार्थी जीव मुठीत घालून पाण्यातून प्रवास करतात.
advertisement
थर्माकोलवरून प्रवास करताना धोका
पाण्यातून प्रवास करण्यासाठी त्यांना सडलेल्या थर्माकॉलचा वापर करावा लागतो. या थर्माकोलवर बसून विद्यार्थी स्वतःच या कठड्यावरून त्या कठड्यावर पोहोचतात. बॅकवॉटरच्या पाण्यातून प्रवास करताना मुलांच्या थर्माकोलवर पाण्यात असलेले विषारी साप चढू नये यासाठी मुलं अनेक वेळा काठी घेऊन बसतात. साप दिसल्यास त्याला ते ढकलून देतात आणि पुढचा प्रवास करत असल्याचे विद्यार्थी सांगतात.
advertisement
तरीही संकट संपत नाही
पाण्यातून प्रवास करून त्यांचा प्रवास थांबत नाही तर नदीपात्रातून बाहेर पडताना नदीपात्राच्या परिसरामध्ये असलेल्या गवतातून त्यांना वाट काढावी लागते. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु अद्यापही अहवाल दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या गावात जाण्यासाठी नऊ कोटी रुपयांतून पूल तयार होऊ शकतो. हा खर्च जलसंपदा विभाग करू शकत नाही. ग्रामविकास विभाग बांधकाम विभाग करू शकतो, असे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं.
advertisement
विद्यार्थ्यांचा धक्कादायक अनुभव
शाळा शिकून मोठा अधिकारी व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मात्र आम्हाला शाळेत जाताना अनेक अडचण येतात. शाळेमध्ये जाण्यासाठी वाहन तर सोडा रस्त्याने चालण्यासाठी रस्ता देखील नाहीये. आम्हाला पाण्यातून वाट काढावी लागते. पाण्यातून वाट काढत असताना आम्ही थर्मकोलवरून प्रवास करतो. या प्रवासामध्ये आम्हाला अनेक वेळा सापांचा सामना करावा लागतो. थर्माकोल वरती अनेक वेळा साप येतात. ते पाण्यात ढकलून द्यावे लागतात असा धक्कादायक अनुभव विद्यार्थी सांगतात.
advertisement
प्रशासनाचे दूर्लक्ष चिंताजनक
गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. बॅकवॉटरचं पाणी बारा महिने असल्यामुळे या ठिकाणाहून वाट काढताना मुलांना मोठा संघर्ष करावा लागतो. आमची मुलं शाळेत जातात त्यावेळेस आम्हाला ते परत येतील का नाही याबाबत शंका असते. कारण त्यांना असंख्य संकटांना सामोरे जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असे ग्रामस्थ विष्णू काळे म्हणतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सडक्या थर्माकोलवर बसून शाळेला जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ, Video पाहून वाटेल भीती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement