दीड वर्षांचा चाणक्य, कोल्हापूरचा अर्शित ठरला जिनियस बालक

Last Updated:

कोल्हापुरातील दीड वर्षांच्या अर्शित शिंदे याची एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवरमुळे जिनिअस कीड म्हणून नोंद झाली आहे.

+
वर्धा

वर्धा जिल्ह्यातील ही 10 पर्यटनाची ठिकाणे पाहिलीत का? एकदा नक्की द्या भेट

कोल्हापूर, 10 ऑगस्ट : नवनवीन गोष्टींबाबत कमालीची उत्सुकता सर्व लहान मुलांमध्ये असते. त्यांना नवनवीन गोष्टींची ओळख त्याचे आई-वडील करून देत असतात. मात्र, पालकांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत एखादे बालक आपल्या उत्तम आकलन क्षमतेच्या जोरावर काहीतरी वेगळं करु लागते. असेच एक बालक सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हापुरातील चक्क एका दीड वर्षांच्या बाळाने आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर आपल्या नावाची नोंद विश्वविक्रमाच्या यादीत केली आहे.
कोल्हापूरच्या नागाळा पार्क परिसरात मूळचे सांगलीचे असणारे शिंदे कुटुंब सध्या कामानिमित्त राहत आहे. त्यांचा दीड वर्षांचा मुलगा अर्शित हा त्याच्या अद्भुत आकलन क्षमतेमुळे सर्वत्र चर्चेत येऊ लागला आहे. खरंतर इतक्या लहान वयात त्याला नीट बोलताही येत नाही. मात्र त्याला दाखवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी तो अगदी बरोबर ओळखतो. त्याच्या याच कामगिरीची दखल घेत चेन्नईच्या 'कलाम्स वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये त्याच्या नावाची नोंद झाली आहे. अर्शित हा त्याच्या या विश्वविक्रमामुळे आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवर जिनिअस कीड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
advertisement
लहानपणीच ओळखली बुद्धिमत्ता..
अर्शित हा अगदी लहानपणापासूनच हुशार असल्याचे आम्हाला जाणवत होते. त्यामुळेच मी आणि त्याच्या बाबांनी त्याची आकलन क्षमता पाहून त्याला सूर्यमाला, विविध प्राणी, पक्षी आदी विविध गोष्टींची ओळख करून दिली. यासाठी आम्ही फ्लॅश कार्ड्सचा वापर केला असे अर्शितची आई अमृता शिंदे यांनी सांगितले.
advertisement
विश्वविक्रमासाठी ओळखल्या या गोष्टी..
अर्शित हा विविध गोष्टी कार्ड्सच्या माध्यमातून ओळखतो. या जागतिक विक्रमात आर्शितने शरीराचे 14 अवयव, सूर्यमाला, 18 फळे, 36 प्राणी-पक्षी, 15 महान व्यक्तिमत्त्वे, इंग्रजी अक्षरे, 9 प्राणीपक्षांचे आवाज आणि त्यांची कृती, 16 प्राणी पक्षाच्या सावल्या, 16 आशियाई आणि युरोपियन देशाचे ध्वज, 41 विविध वस्तू, 16 भाज्या, 9 भावना, 7 रंग आणि आकार, 4 ऋतू, 18 वाहने, 11 मदतनीस, 4 वाहतूकीचे मार्ग, 6 व्यायाम आणि योगासने प्रकार अर्शितने ओळखले आहेत.
advertisement
आश्चर्य, आनंद आणि कौतुक
दरम्यान, आता या छोट्या विक्रमवीराची एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवर जिनिअस कीड म्हणून नोंद झाली असल्यामुळे घरच्या मंडळींसह मित्र परिवारात देखील आनंदाचे वातावरण आहे. तर फक्त दीड वर्षाच्या मुलाने साध्य केलेल्या या यशामुळे त्याच्या कामगिरीबद्दल आश्चर्य आणि कौतुकही दोन्ही भावना कोल्हापूरकरांमध्ये पाहायला मिळत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
दीड वर्षांचा चाणक्य, कोल्हापूरचा अर्शित ठरला जिनियस बालक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement