64 उमेदवार, 1200 मतदार; महाराष्ट्रातील या महाविद्यालयात झाली निवडणूक
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
1200 मतदारांनी 64 उमदेवारांमधून आपले विद्यार्थी प्रतिनिधी निवडले. पाहा कशी झाली ही निवडणूक..
वर्धा, 9 ऑगस्ट: लोकशाही रुजण्यासाठी राजकीय शिक्षणाची गरज असते. हे शिक्षण शालेय जीवनापासूनच मिळाले तर नागरिक अधिक सक्षमपणे या प्रक्रियांना सामोरे जातील. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजने थेट महाविद्यालयातच निवडणूक घेतली. 1200 विद्यार्थी मतदारांनी 64 उमेदवारांमधून आपले 24 प्रतिनिधी निवडले. संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया नियमित निवडणुकांप्रमाणेच पार पडली. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून निवडणुकांचे शिक्षण मिळाले.
महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
वर्धा येथील न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजने 2023-24 साठी विद्यार्थी प्रतिनिधींसाठी निवडणूक घेतली. ही संपूर्ण प्रक्रिया लोकशाही मार्गाने पार पडली. महाविद्यालयातील 1200 विद्यार्थी मतदार होते. तर 64 उमेदवार होते. 1 हजार 32 मतदारांनी मतदान करून 12 विद्यार्थी आणि 12 विद्यार्थिनी असे 24 प्रतिनिधी निवडले. त्यासाठी 6 बुथवर निवडणुकीचा कार्यक्रम झाला.
advertisement
कशी पार पडली निवडणूक?
ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकरीता सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 10 पर्यंत मतदान सुरू होतं. त्यानंतर सकाळी साडेदहा ते साडे अकरा वाजेपर्यंत मतमोजणी झाली. ज्युनिअर कॉलेजचे 24 प्रतिनिधी निवडून आले. त्यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
advertisement
एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलं पोलिसांचं काम
ज्याप्रकारे निवडणुकीला पोलीस अधिकारी, कर्मचारी देखील तैनात असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी चोखपणे कर्तव्य बजावलं. मतदान अधिकारी आणि बीएलओ अशाप्रकारे एकूण 24 मतदान अधिकारी कार्यरत होते. सर्व विद्यार्थ्यांनी दिलेली भूमिका किंवा मिळालेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. प्राचार्या वासंती कुळकर्णी, उप मुख्यध्यापिका अनघा आगवण, निवडणूक अधिकारी शिक्षक महेश आवारे, विज्ञान शाखेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या निवडणुकीला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं.
advertisement
अधिकाऱ्यांनी दिली बूथला भेट
जिल्हा निवडणुक अधिकारी अनिल गावित आणि नायब तहसीलदार अतुल रासपाइले यांनी पोलिंग बूथला भेट देत मार्गदर्शन केलं. शाळेचे अध्यक्ष अनिल काठाने, सचिव अशोक गोएन्का आणि संकचालक नरेंद्र खरे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. अशा प्रकारच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला निवडणूक प्रक्रिया अगदी जवळून कळली आणि भविष्यासाठी आम्हाला एक चांगला अनुभव आणि प्रेरणा या निवडणुकीतून मिळाली असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
August 09, 2023 10:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
64 उमेदवार, 1200 मतदार; महाराष्ट्रातील या महाविद्यालयात झाली निवडणूक