आता वर्ध्याचा सोप्पा पॅटर्न, विद्यार्थ्यांसाठी असा हा अनोखा प्रयोग

Last Updated:

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सध्या एका अनोख्या प्रयोगाची चर्चा आहे. शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिकवले जाणार आहे.

+
आता

आता वर्ध्याचा सोप्पा पॅटर्न, विद्यार्थ्यांसाठी असा हा अनोखा प्रयोग

वर्धा, 5 ऑगस्ट: असं म्हणतात की विद्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट सोप्या पद्धतीने सांगायची असेल तर त्यांना चित्र किंवा काही वस्तू दाखवाव्यात. जेणेकरून ते त्याला न वाचता देखील समजू शकतील आणि त्याचा अभ्यास करू शकतील. याच कल्पनेला लक्षात ठेवून वर्धा डायट म्हणजेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने विशेष कक्षांची निर्मिती केली जात आहे. ज्यात शिक्षणाची पद्धत इंटरेस्टिंग आणि आनंददायी करण्याचे उद्देशाने इतिहास, भूगोल व कला कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षांच्या माध्यमातून विविध मॉडेल्सच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षणात मोलाची मदत होणार आहे.
विद्यार्थी करणार निरीक्षणात्मक अभ्यास
या विशेष कक्षांच्या निर्मितीची सुरुवात मार्च महिन्यात झाली आता हे कार्य ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. इयत्ता चौथी ते दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित या विशेष कक्षांचा उद्देश्य असा आहे की विद्यार्थ्यांना या विषयांचं निरीक्षणात्मक अभ्यास करता येईल. ज्यात इतिहास आदिमानव ते आधुनिक मानव, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास यांचा समावेश आहे. कला कक्षात चित्रकला, शिल्पकला, गायन, वादन, नृत्य, नाट्य यांचा समावेश आहे. अनुरूप स्मरण चित्र, वस्तू चित्र, संकल्पचित्र, निसर्ग चित्र, भौमितिक रचना प्रदर्शित केली जाणार आहे.
advertisement
भूगोल विषयात काय शिकतील विद्यार्थी?
भूगोल कक्षात पर्यावरण, स्वास्थ्य, रेगिस्थान, नकाशा, कोलाम पोड, बांध आदींची माहिती मॉडेल्सच्या माध्यमातून दिली जाणार आहे.. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही याचा फायदा नक्कीच होणार आहे. या उपक्रमाकरिता डायटचे प्राचार्य डॉ मंगेश घोगरे, जिल्हा समन्वयक तथा अधिव्याख्याता दीपाली बासोले, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नीतू गावंडे, डॉ. सीमा पुसदकर, डॉ. उर्मिला हाडेकर, प्रतिभा देशपांडे तथा अन्य कर्मचारी सहकार्य करीत आहेत.
advertisement
टप्प्याटप्प्याने विद्यार्थी देणार भेटी
हे सर्व मॉडेल्स शिक्षकांच्या मदतीने बनविण्यात आले आहेत. या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय शिकण्याचा आनंद घेता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी टप्प्याटप्प्याने या कक्षांना भेटी देणार आहेत आणि या मॉडेल्सचा अभ्यास करणार आहेत. कायमस्वरूपी या ठिकाणी हे मॉडेल्स असणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
आता वर्ध्याचा सोप्पा पॅटर्न, विद्यार्थ्यांसाठी असा हा अनोखा प्रयोग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement