Akshaye Khanna चा सावत्र भाऊ, सुपरहिट फिल्ममध्ये केलं काम, 'त्या' एका घटनेमुळे केला इंडस्ट्रीला रामराम

Last Updated:
Akshaye Khanna Step Brother: अक्षय आणि राहुल खन्नाबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण विनोद खन्नाचा सर्वात लहान मुलगा साक्षी खन्ना याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
1/8
akshaye Khanna stepbrother sakshi Khanna, sakshi Khanna, vinod Khanna sons, akshaye Khanna, akshaye Khanna brother sakshi Khanna, akshaye Khanna Dhurandhar, akshaye Khanna family, sakshi Khanna father, साक्षी खन्ना
मुंबई: सध्या अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या 'धुरंधर' चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'बॉबी देओल'प्रमाणेच अभिनयाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षय चमकतोय. तो ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण विनोद खन्ना यांच्या तीन मुलांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते, मात्र तिघांपैकी केवळ अक्षयच स्टारडम मिळवू शकला.
advertisement
2/8
akshaye Khanna stepbrother sakshi Khanna, sakshi Khanna, vinod Khanna sons, akshaye Khanna, akshaye Khanna brother sakshi Khanna, akshaye Khanna Dhurandhar, akshaye Khanna family, sakshi Khanna father, साक्षी खन्ना
विनोद खन्ना यांनी दोन लग्न केले होते. पहिली पत्नी गीतांजली यांच्यापासून त्यांना अक्षय आणि राहुल खन्ना हे दोन मुलगे आहेत. तर संन्यास घेतल्यानंतर परत आल्यावर त्यांनी कविता यांच्याशी दुसरे लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना मुलगा साक्षी खन्ना आणि मुलगी श्रद्धा खन्ना ही दोन मुले झाली.
advertisement
3/8
akshaye Khanna stepbrother sakshi Khanna, sakshi Khanna, vinod Khanna sons, akshaye Khanna, akshaye Khanna brother sakshi Khanna, akshaye Khanna Dhurandhar, akshaye Khanna family, sakshi Khanna father, साक्षी खन्ना
अक्षय आणि राहुल खन्नाबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण विनोद खन्नाचा सर्वात लहान मुलगा साक्षी खन्ना याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
advertisement
4/8
akshaye Khanna stepbrother sakshi Khanna, sakshi Khanna, vinod Khanna sons, akshaye Khanna, akshaye Khanna brother sakshi Khanna, akshaye Khanna Dhurandhar, akshaye Khanna family, sakshi Khanna father, साक्षी खन्ना
विनोद खन्ना यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा असलेला साक्षी खन्ना याचाही मनोरंजन क्षेत्राशी जवळचा संबंध होता. त्याने केवळ अभिनयातच नव्हे, तर चित्रपट निर्मितीमध्येही हात आजमावला. साक्षीने काही शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले, पण त्याला खरी ओळख मिळाली ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून.
advertisement
5/8
akshaye Khanna stepbrother sakshi Khanna, sakshi Khanna, vinod Khanna sons, akshaye Khanna, akshaye Khanna brother sakshi Khanna, akshaye Khanna Dhurandhar, akshaye Khanna family, sakshi Khanna father, साक्षी खन्ना
त्याने संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सुपरहिट चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. त्यासोबतच, मिलन लूथरिया दिग्दर्शित 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' या चित्रपटातही त्याने सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती.
advertisement
6/8
akshaye Khanna stepbrother sakshi Khanna, sakshi Khanna, vinod Khanna sons, akshaye Khanna, akshaye Khanna brother sakshi Khanna, akshaye Khanna Dhurandhar, akshaye Khanna family, sakshi Khanna father, साक्षी खन्ना
दिग्दर्शन आणि अभिनयात हात आजमावल्यानंतर मिलन लूथरिया यांच्या एका चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज होता, मात्र काही कारणास्तव तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. यानंतर त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले.
advertisement
7/8
akshaye Khanna stepbrother sakshi Khanna, sakshi Khanna, vinod Khanna sons, akshaye Khanna, akshaye Khanna brother sakshi Khanna, akshaye Khanna Dhurandhar, akshaye Khanna family, sakshi Khanna father, साक्षी खन्ना
एवढं ग्लॅमर आणि संधी असूनही साक्षी खन्नाचे मन या भौतिक जगात रमले नाही. हळूहळू त्याचा ओढा अध्यात्मिक जीवनाकडे वाढू लागला. त्याचे हे वळण अगदी त्याचे वडील विनोद खन्ना यांच्यासारखेच होते. विनोद खन्ना यांनीही करिअरच्या शिखरावर असताना संन्यास घेतला होता.
advertisement
8/8
akshaye Khanna stepbrother sakshi Khanna, sakshi Khanna, vinod Khanna sons, akshaye Khanna, akshaye Khanna brother sakshi Khanna, akshaye Khanna Dhurandhar, akshaye Khanna family, sakshi Khanna father, साक्षी खन्ना
साक्षी खन्नानेही चित्रपटांची दुनिया सोडून अध्यात्माच्या वाटेवर चालण्याचे ठरवले. यामुळे भौतिक जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्याने बॉलिवूडपासून स्वतःला दूर ठेवले. आज साक्षी खन्ना भलेही चित्रपटांमुळे लोकप्रिय नसेल, पण सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता बरीच आहे. श्रद्धा कपूर, कियारा आडवाणी, रिया चक्रवर्ती यांसारखे स्टार्स त्याला फॉलो करतात.
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement