Ashok Kharat: आतापर्यंत फक्त ट्रेलर, खरातचा खरा पिक्चर येणार बाहेर, पोलिसांच्या हाती महत्त्वाचा मोहरा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ashok Kharat News: अशोक खरातचा महत्त्वाचा मोहरा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून अशोक खरातच्या सगळ्या काळ्या कृत्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
हरिश दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. शुक्रवारी खरात विरोधात १२ वा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका कांदा व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आता अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण अशोक खरातचा महत्त्वाचा मोहरा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून अशोक खरातच्या सगळ्या काळ्या कृत्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
शिर्डी पोलिसांकडून मागील तीन तासांपासून रमेश हिंगे नावाच्या व्यक्तीची आणि त्याच्या भावाची चौकशी केली जात आहे. रमेश हिंगे हा मागील अनेक वर्षांपासून अशोक खरातसोबत काम करत होता, अशी माहिती आहे. तो खरातचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करायचा, अशी गावात देखील चर्चा आहे. त्यामुळे त्याला अशोक खरातची अनेक गुपितं माहीत असू शकतात, असा संशय आहेत. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
advertisement
रमेश हिंगेचं अशोक खरातशी कनेक्शन काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश हिंगे हा मिरगाव येथील रहिवासी आहे. याच गावात भोंदू अशोक खरात याचं फार्महाऊस आणि ईशान्यश्वर मंदिर आहे, गेल्या अनेक वर्षापासून रमेश हिंगे हा अशोक खरात याचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे. गावात देखील असंच बोललं जातं. अनेक मोठ्या नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात देखील रमेश हिंगे दिसून यायचा. त्यामुळे अनेक गोष्टी रमेश हिंगेला माहीत असण्याची शक्यता आहे.
advertisement
शिर्डीत अशोक खरात विरोधात एका शेतकऱ्याने फसवणुकीची फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली आहे. खरातने समता पतसंस्थेत अनेक बनावट खाती काढली होती. यातून तो बेकायदेशीरपणे कोट्यवधींचे व्यवहार करत असल्याची माहिती आहे. समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातसह रमेश हिंगे आणि त्यांच्या कुटुंबीयांची खाती आहेत. या संदर्भात रमेश हिंगे आणि त्याच्या भावाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे या चौकशीत आता आणखी काय समोर येणार, काय खुलासा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रमेश हिंगेनं अशोक खरातच्या काळ्या कृत्यांची माहिती दिली तर आतापर्यंतचा फक्त ट्रेलर ठरू शकतो. खरा पिक्चर रमेश हिंगे बाहेर काढण्याची शक्यता आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 2:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat: आतापर्यंत फक्त ट्रेलर, खरातचा खरा पिक्चर येणार बाहेर, पोलिसांच्या हाती महत्त्वाचा मोहरा








