advertisement

'I am getting into his shoes' सुर्यकुमारला नक्की काय म्हणायचंय ? MI vs DC च्या मॅचमध्ये हार्दिक का आला नाही?

Last Updated:

अनेकांना वाटेल की याचा अर्थ कोणाचे तरी 'बूट घालणे' असा होतो, मग सुर्याने कोणाचे शुज घातले? असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण इंग्रजी व्याकरण आणि संभाषणात हा एक अतिशय प्रसिद्ध वाक्प्रचार (Idiom) आहे.

MI VS DC
MI VS DC
मुंबई : आयपीएल 2026 च्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) सामन्यात एका मोठ्या बदलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टॉससाठी हार्दिक पांड्याऐवजी SKY म्हणजे सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. हार्दिकची तब्येत ठीक नसल्याने सूर्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. पण टॉसच्या वेळी सूर्याने वापरलेलं एक वाक्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, ते म्हणजे "I'm getting into his shoes today."
'Getting into someone's shoes' म्हणजे नक्की काय?
अनेकांना वाटेल की याचा अर्थ कोणाचे तरी 'बूट घालणे' असा होतो, मग सुर्याने कोणाचे शुज घातले? असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण इंग्रजी व्याकरण आणि संभाषणात हा एक अतिशय प्रसिद्ध वाक्प्रचार (Idiom) आहे.
त्यामुळे सुर्याने वापरलेल्या I'm getting into his shoes today' याचा अर्थ एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारणे किंवा त्या व्यक्तीच्या परिस्थितीत स्वतःला ठेवून काम करणे.
advertisement
या शब्दाचा वापर कधी होतो?
जेव्हा एखादी व्यक्ती उपलब्ध नसते आणि तिचे काम दुसऱ्याला करावे लागते, तेव्हा "Step into their shoes" किंवा "Get into their shoes" असे म्हटले जाते. हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून जे काम करणार होता, ती मोठी जबाबदारी आज मी स्वीकारली आहे, असे सूर्याला सुचवायचे होते.
सूर्या काय म्हणाला?
टॉस झाल्यानंतर जेव्हा सूर्याला हार्दिकबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, "हार्दिकची प्रकृती ठीक नाहीये, परिस्थिती सध्या तरी फारशी चांगली दिसत नाहीये. त्यामुळे आज मी त्याच्या जागी ही जबाबदारी स्वीकारतोय (I'm getting into his shoes today). जर तुम्ही 13-14 वर्षांनंतर पहिला सामना जिंकता, तेव्हा आत्मविश्वास खूप वाढलेला असतो. टॉसचा निकाल आमच्यासाठी फारसा महत्त्वाचा नव्हता, आम्हाला आधी फलंदाजीच करायची होती. हार्दिकच्या जागी दीपक चहर आला आहे, तर बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉशला संधी दिली आहे, हा एक Tactical निर्णय आहे. तसेच, गझनफरच्या जागी मिचेल सँटनर संघात आला आहे."
advertisement
मुंबईच्या संघात झालेले मोठे बदल
हार्दिकच्या अनुपस्थितीत संघाने केवळ कर्णधारच बदलला नाही, तर प्लेइंग इलेव्हनमध्येही मोठे बदल केले आहेत. हार्दिकच्या जागी अनुभवी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टच्या जागी टॅक्टिकल कॉल म्हणून कॉर्बिन बॉशला स्थान मिळाले. तर युवा फिरकीपटू गझनफरच्या जागी अनुभवी सँटनरला संधी मिळाली आहे.
जर तुम्हाला एखाद्या मित्राच्या जागी त्याचे काम करायचे असेल, तर तुम्ही "Don't worry, I will step into your shoes for today's meeting." (काळजी नको, आजच्या मीटिंगसाठी मी तुझी जबाबदारी सांभाळेन.) असं म्हणू शकता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'I am getting into his shoes' सुर्यकुमारला नक्की काय म्हणायचंय ? MI vs DC च्या मॅचमध्ये हार्दिक का आला नाही?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement