Akshaye Khanna Sunglasses Price: अक्षय खन्नाच्या एंट्रीने धूळ उडवली, 'Fa9la' गाण्यातील गॉगलची किंमत किती? स्पॅनिश ब्रँड आणि Price...

Last Updated:

Akshaye Khanna Sunglasses Cost in Dhurandhar: ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाची एंट्री सॉन्ग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्याच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. विशेषतः त्याने घातलेला स्टायलिश गॉगल नेमका कोणत्या ब्रँडचा आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

News18
News18
मुंबई: अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर तो जोरदार यश मिळवत आहे. या चित्रपटातील अक्षय खन्नाची एंट्री सॉन्गFa9la (फस्ला)’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्यात अक्षय खन्ना काळ्या रंगाच्या सूटमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात दिसतोय. तो आपल्या कारमधून उतरून दिमाखात एका छोट्या कार्यक्रमात प्रवेश करतात आणि सर्वांनासलामकरत अभिवादन करताना दिसतो.
advertisement
या संपूर्ण सीनमध्ये अक्षयची स्टाईल आणि त्याने घातलेला गॉगल प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण हा गॉगल नेमका कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याची किंमत किती, याबाबत विचारणा करू लागले.
advertisement
गॉगलची किंमत किती?
इंटरनेटवर या गॉगलबाबत फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिट (Reddit) वर एका युजरने अक्षय खन्नाच्या गॉगलबाबत प्रश्न विचारला होता. त्या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. काही जणांनी सांगितले की, हा गॉगल GIGI Studios या कंपनीचा आहे.
advertisement
रेडिटवरील एका युजरनुसार, ‘धुरंधर’च्या एंट्री सॉन्गमध्ये अक्षय खन्नाने घातलेला गॉगल GIGI Studios कंपनीचा 6670/1 मॉडेल आहे. या गॉगलची किंमत अंदाजे 25 हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
स्पेनमधील कंपनी
GIGI Studios ही स्पेनमधील कंपनी आहे. ही कंपनी विविध प्रकारचे स्टायलिश आणि प्रीमियम गॉगल तयार करते. पूर्वी ही कंपनी GIGI Barcelona या नावाने ओळखली जात होती. या कंपनीची स्थापना 1962 साली झाली होती.
advertisement
आज ही कंपनी जगभरातील 45 हून अधिक देशांमध्ये आपले प्रोडक्ट्स विकते. या कंपनीची खासियत म्हणजे त्यांच्या गॉगलची फ्रेम पूर्णपणे हाताने तयार केले जातात. एक गॉगलची फ्रेम तयार होण्यासाठी सुमारे 100 वेगवेगळ्या टप्प्यांमधून जावे लागते.
advertisement
अनेक सेलिब्रिटींची पसंती
GIGI Studios कंपनीचे गॉगल जगभरातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी वापरतात. यामध्ये अमेरिकन अभिनेत्री जेसिका बील, यूके अभिनेतागायक एड वेस्टविक, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेता एरिन वॉसन यांचा समावेश आहे.  
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Akshaye Khanna Sunglasses Price: अक्षय खन्नाच्या एंट्रीने धूळ उडवली, 'Fa9la' गाण्यातील गॉगलची किंमत किती? स्पॅनिश ब्रँड आणि Price...
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement