अजिंठा लेणी अन् बीबी का मकबरा, छत्रपती संभाजीनगरमधील ही 10 ठिकाणं पाहिलीत का?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
छत्रपती संभाजी नगर जिल्हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातील ही 10 पर्यटनस्थळे नक्की पाहा.
छत्रपती संभाजी नगर जिल्हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वारसा असलेले पर्यटन स्थळ हे आहेत. महाराष्ट्रात पर्यटनाला बाहेर पडायचं म्हटलं की ऐतिहासिक वास्तू आणि वारशांनी समृद्ध असणाऱ्या छत्रपती <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/" target="_blank" rel="noopener">संभाजीनगर</a> जिल्हा अनेकांची पसंती असते. जिल्ह्यातील 10 ठिकाणे नक्की पाहा.
advertisement
अजिंठा लेणी ह्या सोयगाव तालुका संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व 2 रे शतक ते इ.स. 4 थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात ह्या लेणी आहेत. यात 29 बौद्ध लेणी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरापासून 100 ते 110 कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. भारताची जागतिक पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या लेणी म्हणून अजिंठाची ओळख आहे.
advertisement
वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजी नगर शहरापासून 30 कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे.
advertisement
बीबी का मकरबा या वास्तूला बांधण्यास सतराव्या शतकात सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे. 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. तिला जिथं दफन करण्यात आलं. तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहरापासून 3 किमी अंतरावर हा मकबरा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
औरंगाबाद लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील बौद्ध लेणी असून ती डोंगरात खोदलेली आहे. ही बौद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इ.स.चे 6 वे शतक ते इ.स.चे 7 वे शतक यादरम्यान ही लेणी निर्माण करण्यात आली आहे. यात लेण्यांची संख्या 12 इतकी आहे. ही लेणी बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे.


