VIDEO : वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये रोहित आणि विराटला संधी द्यावी का? MS Dhoni ने थोडक्या शब्दात सगळ्यांना गार केलं! काय म्हणतो थाला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MS Dhoni React on Rohit Sharma and Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असल्याने, आता त्यांचे संपूर्ण लक्ष 2027 च्या वनडे वर्ल्ड कपकडे लागलं आहे. धोनीने यावर प्रतिक्रिया दिली.
MS Dhoni React on Rohit Sharma and Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघ सध्या 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया या स्पर्धेत डिफेन्डिंग चॅम्पियन म्हणून उतरत असून, 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावून इतिहास रचला होता. यावेळी हे विजेतेपद टिकवण्याची मोठी जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर आहे. अशातच आता महेंद्रसिंग धोनीने देखील टीम इंडियाचं कौतूक केलं. यावेळी त्याने रोहित अन् विराटवर देखील भाष्य केलं.
रोहित आणि विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळू शकतील का?
गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात एकच प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे वाढत्या वयामुळे रोहित आणि विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळू शकतील का? रोहित आणि विराटने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये रन्सचा पाऊस पाडून आपण अजूनही फॉर्मात असल्याचे दाखवून दिलं. तरीही त्यांच्या समावेशाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती, मात्र आता भारताचा यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनी याने या वादावर पडदा टाकला आहे.
advertisement
वय हा क्रायटेरिया नसून फिटनेस
एका कार्यक्रमादरम्यान धोनीला विचारण्यात आले की, रोहित आणि विराटला 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये जागा मिळायला हवी का? यावर धोनीने अत्यंत सकारात्मक उत्तर देत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. धोनी म्हणाला, "त्यांनी का खेळू नये? वय हा कोणताही क्रायटेरिया नसून परफॉर्मन्स आणि फिटनेस हे महत्त्वाचे निकष आहेत. जर ते चांगली कामगिरी करत असतील आणि खेळासाठी पूर्णपणे समर्पित असतील, तर त्यांना नक्कीच संधी मिळायला हवी."
advertisement
MS DHONI TALKS ABOUT KOHLI AND ROHIT'S FUTURE IN ODIs
- Age shouldn't be the criteria, performance and fitness should be the criteria.
- They have played enough cricket to decide what they have to do.
- Each and every player should be treated equally. pic.twitter.com/akmg0UvwyF
— ` (@WorshipDhoni) February 4, 2026
advertisement
कमीत कमी खेळाडूने 80 गेम तरी...
धोनीने अनुभवाचे महत्त्व सांगताना सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिलं. तो म्हणाला, "तुम्ही एखादा 20 वर्षांचा खेळाडू शोधू शकत नाही ज्याच्याकडे इतका मोठा अनुभव असेल, जोपर्यंत तो खेळाडू सचिन तेंडूलकर नसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खूप वेगळं आहे. त्यामुळे तिथं अनुभव हवा असतो. कमीत कमी खेळाडूने 80 गेम तरी खेळल्या पाहिजे." धोनीच्या या विधानामुळे रोहित आणि विराटच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये हे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसण्याची शक्यता बळावली आहे.
advertisement
सिलेक्शनवेळी फक्त दोनच पर्याय...
दरम्यान, तुमचं वय जरी 35 असलं तरी देखील तुम्हाला सेमच कामगिरी करावी लागते. 24 वर्षाच्या पोराला आणि 35 वर्षाच्या खेळाडूला परफॉर्मन्स करावा लागतो. कामगिरी केली तर संघात ठेवा, केली नाही तर संघाच नसेल, हाच एक फॉर्म्युला आधीपासून आहे. सिलेक्शनवेळी फक्त दोनच पर्याय असले पाहिजेत, ते म्हणजे तुमचा परफ़ॉर्मन्स आणि तुमची फिटनेस, असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 12:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये रोहित आणि विराटला संधी द्यावी का? MS Dhoni ने थोडक्या शब्दात सगळ्यांना गार केलं! काय म्हणतो थाला?










