तो रात्री रस्त्यावर वाहनाची वाट बघत होता; अचानक एक कार जवळ आली अन्..., पुण्यात खळबळजनक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रात्रीच्या सुमारास तो नगर रस्ता परिसरातून घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबला होता. त्याच वेळी एक कार त्याच्याजवळ आली.
पुणे: पुण्यातील नगर रस्ता परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे रेल्वे स्टेशनला सोडण्याची बतावणी करून एका तरुणाला कारमध्ये लिफ्ट दिली आणि त्यानंतर कारमधील चालक आणि त्याच्या चार साथीदारांनी तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशांनी अनोळखी वाहनात बसू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार तरुण हा शहरातील नरपतगिरी चौक परिसरात राहतो. रात्रीच्या सुमारास तो नगर रस्ता परिसरातून घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबला होता. त्याच वेळी एक कार त्याच्याजवळ आली. कार चालकाने "पुणे स्टेशनला जायचे आहे का? आम्ही तिकडेच चाललो आहोत, सोडू का?" अशी विचारणा केली. रात्रीची वेळ असल्याने आणि वाहन मिळत नसल्याने तरुणाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तो कारमध्ये बसला.
advertisement
कार थोड्या अंतरावर गेल्यानंतर, कारमधील चालकासह त्याच्यासोबत असलेल्या इतर चार साथीदारांनी आपले खरे रूप दाखवले. त्यांनी तरुणाला धाक दाखवून लुटले. तरुणाकडील मौल्यवान वस्तू आणि रोकड काढून घेतल्यानंतर चोरट्यांनी त्याला निर्जन स्थळी सोडून दिले आणि कारसह पसार झाले. या घटनेमुळे शहरात 'लिफ्ट' देणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीडित तरुणाने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी कार चालक आणि त्याच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नगर रस्ता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, ही कार कोणत्या मार्गाने गेली याचा शोध पोलीस घेत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 12:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
तो रात्री रस्त्यावर वाहनाची वाट बघत होता; अचानक एक कार जवळ आली अन्..., पुण्यात खळबळजनक घटना








