Chhatrapati Sambhajinagar: लाडाचा जावईच निघाला चोर, पोलिसांनी कसा केला भांडाफोड? छ. संभाजीनगरची घटना

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत आरोपी जेरबंद झाला.

Chhatrapati Sambhajinagar: लाडाचा जावईच निघाला चोर, पोलिसांनी कसा केला भांडाफोड? छ. संभाजीनगरची घटना
Chhatrapati Sambhajinagar: लाडाचा जावईच निघाला चोर, पोलिसांनी कसा केला भांडाफोड? छ. संभाजीनगरची घटना
छत्रपती संभाजीनगर : घरजावई म्हणून आला आणि कुटुंबात स्थान मिळवलं. चार वर्षांपासून समाजात मिसळून राहत विश्वास संपादन केला. पण, आतून मात्र तो सतत चोरीच्या संधीच्या शोधात होता. अखेर हा विश्वासघातकी घरजावई दुचाकी चोरी करत असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. परिसरातील वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत आरोपी जेरबंद झाला आणि त्याच्याकडून तब्बल सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणानं शहरात एकच खळबळ उडाली असून, ‘घरजावईवरही डोळेझाक नको’ असा इशाराच नागरिकांतून दिला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील अताउर रहमान निसार अहमद अन्सारी (40, रा. सिटी चौक परिसर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे चार वर्षांपूर्वी शहरातील एका मुलीशी लग्न झाले होते. तेव्हापासून त्याचे शहरात वास्तव्य होते. तो टेलर म्हणून काम करून उदरनिर्वाह करत होता. त्याच काळात त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे पैसे पुरत नसल्याने त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. यात तो दारूच्या ठेक्यावर येणाऱ्या मंडळींची दुचाकी चोरायचा. चोरी केलेल्या सर्व दुचाकी तो मालेगावात मिळून विक्री करत होता. चोरीच्या दुचाकी मालेगावात पोहोचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत होता.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्या पथकाने ही कारवाई नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बसस्थानकावर केली. यात 2 लाख 45 हजारांच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: लाडाचा जावईच निघाला चोर, पोलिसांनी कसा केला भांडाफोड? छ. संभाजीनगरची घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement