छत्रपती संभाजीनगरमध्ये RSS च्या सदस्यांना शिवीगाळ; नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अर्थात RSSच्या काही सदस्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अर्थात RSSच्या काही सदस्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरएसएसकडून सदस्य नोंदणी सुरू असताना काहीजणांनी संघाच्या सदस्यांना लक्ष्य करून शिवीगाळ केली. यावरून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या दोन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तातडीने कठोर भूमिका घेत नऊ जणांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. संघाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू असताना शहरात दोन ठिकाणी अशा प्रकारच्या शिवीगाळीच्या घटना घडल्या.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएसच्या सदस्यांकडून एका कॉलेजच्या गेटवर सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेतला जात होता. यावर काही समाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. कॉलेजच्या बाहेर अशाप्रकारे सदस्य नोंदणी करू नका. मंदिराच्या बाहेर अशा नोंदण्या करा. विद्यार्थ्यांना शिक्षण करू द्यायचं की, त्यांना धार्मिक संघटनेत घ्यायचं? परवानगी न घेता तुम्ही अशाप्रकारे गेटवर कसं काय नोंदणी कार्यक्रम करत आहात? अशा प्रकारचा जाब विचारून त्यांचा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम बंद पाडला.
advertisement
वेदांतनगरमधील पहिली घटना
१० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाबाहेर RSS चे काही कार्यकर्ते सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबवत होते. यावेळी इथं आलेल्या काही जणांनी आरएसएसच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी राहुल मकासरे, अभिमन्यू अंभोरे, शैलेश चाबुकस्वार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उस्मानपुरा येथील दुसरी घटना
advertisement
आरएसएसच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ झाल्याची दुसरी घटना उस्मानपुरा भागात घडली. १४ ऑक्टोबर रोजी रेल्वेस्थानक रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेत धार्मिक भावना दुखावणारे वर्तन केल्याप्रकरणी विजय वाहुळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची कठोर कारवाई
या दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांना हेतुपुरस्सर शिवीगाळ करून, समाजात वाद आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणांची दखल घेत दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही घटनांचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 19, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छत्रपती संभाजीनगरमध्ये RSS च्या सदस्यांना शिवीगाळ; नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?