advertisement

Dharashiv Zilla Parishad Election Results: 'मोठे मोठे गार केले गंमत मधी', पुतण्या ठरला भारी; सावंत काकांचा पराभव केला दारी!

Last Updated:

पुतण्या धनंजय यांनी काकांच्याच बालेकिल्ल्यात विजयी गुलाल उधळला आहे. विशेष म्हणजे, धनंजय सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

News18
News18
धाराशिव : महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि पुतण्याची जोडी नवी नाही. पण, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुतण्याने बंडखोरी करून काकाला आस्मान दाखवलं आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी निवडणूक जिंकून दाखवली आहे. पुतण्या धनंजय यांनी काकांच्याच बालेकिल्ल्यात विजयी गुलाल उधळला आहे. विशेष म्हणजे, धनंजय सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात जवळा जिल्हा परिषद निवडणूक यंदा चांगलीच गाजली.  राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना त्यांचेच पुतणे धनंजय सावंत यांनी थेट आव्हान दिलं होतं.  धनंजय सावंत याांनी सेनेत बंडखोरी करून स्वबळावर  निवडणूक लढवली होती. अखेरीस मतमोजणीत  जवळा जिल्हा परिषद गटातून धनंजय सावंत विजयी झाले आहे.  2443 मतांनी सावंत विजयी झाले आहे.
advertisement
तानाजी सावंत यांचा परंडा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, घरातीलच व्यक्तीने बंडखोरी करून काकांची डोकेदुखी वाढवली होती.  धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. स्वतः धनंजय सावंत हे निजाम जवळा गटातून जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत  धनंजय सावंत यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पुतण्या धनंजय सावंत यांनीच आव्हान दिल्यामुळे तानाजी सावंत यांची प्रतिष्ठपणाला लागली होती.
advertisement
खासदार निंबाळकरांचंही होतं आव्हान
तर दुसरीकडे जवळा जिल्हा परिषदेसाठी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आव्हान होतं. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे  निंबाळकर यांनी या ठिकाणी विशेष लक्ष दिलं होतं. त्यामुळे सावंत विरुद्ध निंबाळकर अशी सुद्धा लढत होती. पण जवळामध्ये धनंजय सावंत हे धुरंदर ठरले आहे. खासदार आणि काका माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पराभव करून धनंजय सांत विजयी झाले. या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
advertisement
म्हणून काका विरोधात मैदानात
धनंजय सावंत यांनी काका तानाजी सावंत यांच्याकडे शिवसेनेकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण, जवळच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे नाराज झालेल्या धनंजय सावंत यांनी काकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं ठरवलं. कार्यकर्त्यांची गरज संपली की चप्पल सारखं सोडून नेता पुढे जातो, माझी गरज संपली म्हणून मला १० महिन्यांपासून बोलावलं नव्हतं, असं म्हणत धनंजय सावंत यांनी काकांच्या विरोधात आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv Zilla Parishad Election Results: 'मोठे मोठे गार केले गंमत मधी', पुतण्या ठरला भारी; सावंत काकांचा पराभव केला दारी!
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement