advertisement

Maharashtra politics : बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसला मोठा धक्का; नेत्याचं राजीनामास्त्र

Last Updated:

काँग्रेसनं धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करताच पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

News18
News18
धुळे, दीपक बोरसे, प्रतिनिधी : धुळ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसनं डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी बच्छाव यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला आहे. शामकांत सनेर हे देखील धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते.
धुळे लोकसभा मतदार संघात बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने मला उमेदवारी नाकारून माझ्यावर अन्याय केला, असा आरोप शामकांत सनेर यांनी केला आहे. दरम्यान दोन दिवसांत पक्षाने उमेदवार न बदलल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा देखील  सनेर यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाबाबत येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान सनेर यांनी बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.  दोन दिवसांत पक्षाने उमेदवार न बदलल्यास तीव्र भूमिका घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता धुळ्यात काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीवर सनेर यांच्यासोबतच स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेतृत्व धुळ्याच्या जागेबाबत काय निर्णय घेणार? याकेड राज्याचं लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
Maharashtra politics : बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसला मोठा धक्का; नेत्याचं राजीनामास्त्र
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement