Navratri 2025: नवरात्रीत गरबा खेळण्याची इच्छा आहे? सोप्या टिप्सचा पाहा Video
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Navratri 2025: पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये खास गरबा शिकवण्याचे वर्ग सुरू झाले आहेत.
पुणे: आजपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सव सुरू होत आहे. नवरात्रीचा सण हा गरबा आणि दांडियाशिवाय अपूर्ण मानला जातो. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने देवीची आराधना करण्यासोबत गरबा खेळला जातो. त्यामुळे तरुण पिढीपासून ते महिलांपर्यंत सर्वांनाच गरबा शिकण्याची उत्सुकता असते. पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये आणि वसाहतींमध्ये खास गरबा शिकवण्याचे वर्ग सुरू झाले आहेत. या वर्गांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
ध्वनी शाह या गेल्या तीन ते चार वर्षांपासून गरबा शिकवत आहेत. त्या स्वतः गुजराती असल्याने त्यांना गरबा शिकवण्यात विशेष रस आहे. ध्वनी शाह म्हणाल्या, "अनेकांना गरबा खेळायची खूप आवड असते. पण, योग्य पद्धत माहिती नसल्याने त्यांना चांगला गरबा खेळता येत नाही. यासाठीच आम्ही सोसायटीमध्ये गरबा शिकवायला सुरुवात केली. लहान मुलांपासून ते 50 वर्षांपर्यंतच्या महिला आमच्याकडे शिकायला येतात. दोन टाळी, तीन टाळी आणि दांडिया हे त्याचे बेसिक प्रकार आहेत. सोप्या पद्धतीने शिकवलं तर प्रत्येकालाच गरबा खेळता येऊ शकतो."
advertisement
गरबा शिकताना सुरुवातीला एक गाणं निवडून त्यानुसार एकेक स्टेप्स शिकत गेल्यास पटकन लक्षात राहतं. गरब्यातील प्रत्येक हालचालीला ताल आणि लय आवश्यक असते. एकदा हे जमलं की, नंतर कुठल्याही गाण्यावर सहज नृत्य करता येतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून गरब्याची क्रेझ वाढली आहे, अशी माहिती सोना जयसिंघानिया यांनी दिली.
advertisement
नवरात्रौत्सवात गरबा हा फक्त नृत्यप्रकार राहत नाही. आनंद, एकता आणि भक्तीचा उत्सव साजरा करण्याचा तो एक मार्ग मानला जातो. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही गरब्याचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी गरब्याच्या स्पर्धा देखील होतात. त्यामुळे गरबा फक्त छंदापुरता मर्यादित न राहता तो सण साजरा करण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सध्या पुण्यासह राज्यभरात गरबा क्लासेसची मागणी वाढली आहे. शरीर तंदुरुस्त ठेवणारा आणि सामाजिक बंध घट्ट करणारा हा नृत्यप्रकार प्रत्येकासाठी आकर्षण ठरत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 22, 2025 1:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: नवरात्रीत गरबा खेळण्याची इच्छा आहे? सोप्या टिप्सचा पाहा Video