navratri 2025 : गरबा किंवा दांडिया खेळताना खरंच हार्ट अटॅकचा धोका आहे का? या चुका टाळाल तर राहाल सुरक्षित
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
अनेक लोक नियमित आरोग्य तपासणी करत नाहीत. अशावेळी अचानक जोरदार नृत्य किंवा उपाशीपोटी गरबा केल्याने हृदयावर ताण येतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
पुणे: आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात विविध ठिकाणी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आराधना, जागरण, गरबा आणि दांडिया अशा अनेक कार्यक्रमांतून भक्तांचा उत्साह दिसून येतो. पण या उत्सवाच्या आनंदात काही दुर्दैवी घटना देखील घडतात. दरवर्षी आपण ऐकतो की गरबा किंवा नृत्य करत असताना एखाद्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, खरंच गरबा किंवा डान्स केल्याने हार्ट अटॅक येतो का? या काळात आपण नकळत कोणत्या चुका करतो ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो? याबाबत डॉ. संजीव जाधव यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांनी सांगितलं की, आपल्यापैकी अनेक जण नियमित आरोग्य तपासणी करत नाहीत. त्यामुळे शरीरात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे किंवा कोणता आजार आहे हे वेळेत लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत नवरात्रोत्सवात अचानक गरबा किंवा जोरदार नृत्य केल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
advertisement
तसेच, डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले की, अनेक लोक उपवास करून गरबा करायला जातात. त्यामुळेही हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कारण गरबा हा एका प्रकारचा व्यायाम आहे. तो अचानक केल्याने शरीरावर मोठ्या प्रमाणात ताण येतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
विशेष म्हणजे ज्यांच्या हृदयात ब्लॉकेज आहेत त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. नवरात्रीत गरबा किंवा जोरदार नृत्य करताना शरीरावर अचानक ताण येतो, ज्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी उत्सवाचा आनंद साजरा करत असताना स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. संजीव जाधव यांनी दिला आहे. गरबा खेळताना हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणे असतात, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, डिहायड्रेशन आणि अपुरी झोप यांचा समावेश होतो.
advertisement
गरबा खेळताना कोणती काळजी घ्यावी
आरोग्य तपासणी करा – गरबा खेळण्यापूर्वी तुमचे आरोग्य तपासणे महत्त्वाचे आहे. हृदयविकार किंवा इतर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि गरबा टाळा.
हायड्रेट राहा – गरबा किंवा डान्स करत असताना शरीरात पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
व्यायाम आणि वॉर्म-अप - गरबा खेळायला जाण्यापूर्वी हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग करा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 22, 2025 12:04 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
navratri 2025 : गरबा किंवा दांडिया खेळताना खरंच हार्ट अटॅकचा धोका आहे का? या चुका टाळाल तर राहाल सुरक्षित