Tourist Photography: भटकंती करून मिळणार 5 लाख रुपये! पण, कुठे आणि कसे? वाचा A टू Z माहिती

Last Updated:

Tourist Photography: महाराष्ट्रात नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या असंख्य ठिकाणांचा समावेश आहे.

Tourist Photography: भटकंती करून मिळणार 5 लाख रुपये! पण, कुठे आणि कसे? वाचा A टू Z माहिती
Tourist Photography: भटकंती करून मिळणार 5 लाख रुपये! पण, कुठे आणि कसे? वाचा A टू Z माहिती
मुंबई: आपल्या महाराष्ट्रात नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या असंख्य ठिकाणांचा समावेश आहे. काही हौशी नागरिक याठिकाणी पर्यटनाला देखील जातात. याच पर्यटकांचा वापर करून राज्यातील पर्यटनाला चालना देण्याचा विचार पर्यटन विकास महामंडळाने केला आहे. यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी एका विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. यातून राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रसार तर होईलच शिवाय निवडक पर्यटकांना आर्थिक लाभ देखील होणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 175वी संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी सरकार 'एमटीडीसी'मार्फत 'तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे' हा उपक्रम राबवणात आहे. या उपक्रमात प्रवासी फोटोग्राफर्सनी घेतलेल्या फोटोंमधून काही उत्कृष्ट फोटोंची निवड करून विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत.
advertisement
डिजिटल फोटो प्रदर्शन
महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचं सौंदर्य, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात प्रवाशांनी घेतलेले निवडक फोटोंची फोटो ऑफ दि डे, फोटो ऑफ दी मंथ आणि फोटो ऑफ दी इयर या श्रेणींमध्ये विभागणी केली जाईल. हे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातील. डिजिटल फोटो गॅलरीमध्ये निवडक फोटोग्राफर्सची माहिती देखील प्रदर्शित केली जाईल.
advertisement
लोकशाही पद्धतीने विजेत्यांची निवड
पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडून फोटोंची निवड केली जाईल. 'फोटो ऑफ दी इयर' या श्रेणीतील प्रथम विजेत्याला 5 लाख रुपये, प्रथम उपविजेत्याला 1 लाख रुपये, द्वितीय उपविजेत्याला 75 हजार रुपयांचं बक्षिस दिलं जाईल. शिवाय, पाच उत्स्फूर्त बक्षिसांच्या श्रेणीत प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येतील. 'फोटो ऑफ दी मंथ' श्रेणीतील विजेत्यांना दोन जणांसाठी तीन दिवस आणि दोन रात्री एमटीडीसी रिसॉर्टमध्ये विनामूल्य राहण्याचे पास दिले जाणार आहेत. अंतिम विजेत्यांची निवड करण्यासाठी ऑनलाईन मतदानाची पद्धत वापरली जाणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tourist Photography: भटकंती करून मिळणार 5 लाख रुपये! पण, कुठे आणि कसे? वाचा A टू Z माहिती
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement