advertisement

Success Story : पारंपरिक शेतीला दिला फाटा, 20 गुंठ्यात उभारला नर्सरी व्यवसाय, वर्षाला 7 लाख कमाई

Last Updated:
सुरुवातीला छोट्या प्रमाणावर सुरू झालेला हा व्यवसाय आज शेतकरी आणि बागकामप्रेमींमध्ये विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखला जात आहे.
1/5
बीड जिल्ह्यातील दत्ता सोनवणे यांनी पारंपरिक शेतीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता पूरक व्यवसायाची वाट निवडली आणि त्यातून आर्थिक स्थैर्य साधले. अडीच एकर शेती असलेल्या सोनवणे यांनी सुमारे 20 गुंठे क्षेत्रात नर्सरी व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणावर सुरू झालेला हा व्यवसाय आज शेतकरी आणि बागकामप्रेमींमध्ये विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखला जात आहे.

2/5
नर्सरीच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी मिरची, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर यांसारख्या भाजीपाला रोपांची निर्मिती केली. स्थानिक शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी दर्जेदार आणि निरोगी रोपे तयार करण्यावर भर दिला. रोपांना चांगली वाढ मिळावी यासाठी जैविक खतांचा वापर वाढवण्यात आला. त्यामुळे त्यांच्या नर्सरीतील रोपांची गुणवत्ता लवकरच चर्चेचा विषय ठरली.

3/5
व्यवसाय वाढत गेल्यानंतर सोनवणे यांनी फळझाडांची रोपे, औषधी वनस्पती तसेच शोभेची झाडे यांचे उत्पादन सुरू केले. ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार त्यांनी विविधता वाढवत नर्सरीचा विस्तार केला. आज त्यांच्या रोपवाटिकेत अनेक प्रकारची रोपे उपलब्ध असून बीडसह इतर जिल्ह्यांतील ग्राहकही येथे खरेदीसाठी येतात.

4/5
या प्रवासात सुरुवातीला बाजारपेठ मिळवणे, भांडवल व्यवस्थापन आणि सातत्य राखणे ही मोठी आव्हाने होती. मात्र त्यांनी संयम आणि मेहनतीच्या जोरावर या अडचणींवर मात केली. सातत्याने दर्जा सुधारत राहिल्यामुळे ग्राहकांचा विश्वास मिळवण्यात ते यशस्वी ठरले. यामधून वर्षाला 7 लाखांची कमाई होत आहे.

5/5
नर्सरी व्यवसायामुळे दत्ता सोनवणे यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात ऑनलाइन माध्यमातून रोपविक्री सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. शेतीसोबत पूरक व्यवसाय कसा उभारता येतो, याचे प्रेरणादायी उदाहरण दत्ता सोनवणे यांनी उभे केले आहे.

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement