Uric acid diet : डाळ खाल्यामुळे यूरिक ॲसिड वाढतं? आहारतज्ज्ञ काय सांगतात, तुम्हाला माहित असायला हवं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी यावर महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. डाळी पूर्णपणे बंद करण्याऐवजी, कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा हे समजून घेतल्यास तुम्ही या समस्येवर मात करू शकता.
गरमागरम भात, त्यावर साजूक तूप आणि पिवळधमक वरण... हे जेवण म्हणजे आपल्यासाठी एक सुखद अनुभव असतो. पण अलीकडच्या काळात अनेकांसाठी हे जेवण चिंतेचं कारण बनलं आहे. कारण आहे 'यूरिक ॲसिड' (Uric Acid). सध्या घराघरात सांधेदुखी, टाचांमध्ये वेदना किंवा किडनी स्टोनच्या तक्रारी वाढल्या आहेत आणि याला जबाबदार धरलं जातंय आपल्या आहारातील डाळींना.
advertisement
advertisement
आपल्या अन्नामध्ये 'प्युरीन' नावाचा पदार्थ असतो, ज्याचे पचन झाल्यावर शरीरात 'यूरिक ॲसिड' तयार होते. हे ॲसिड रक्ताद्वारे किडनीपर्यंत जाते आणि लघवीवाटे बाहेर पडते. पण जेव्हा शरीरात याचे प्रमाण वाढते, तेव्हा त्याचे लहान स्फटिक (Crystals) तयार होऊन सांध्यांमध्ये जमा होतात. यामुळेच सांधेदुखी आणि गाउटचा त्रास सुरू होतो.
advertisement
advertisement
advertisement
1. भिजवून शिजवा: डाळी किंवा कडधान्ये शिजवण्यापूर्वी किमान 6 ते 8 तास भिजत ठेवा. त्यातील पाणी फेकून द्या आणि ताज्या पाण्यात शिजवा. यामुळे गॅस आणि प्युरीनचे प्रमाण कमी होते.2. पाण्याचे प्रमाण वाढवा: दिवसाला किमान 3-4 लिटर पाणी प्या. यामुळे शरीरातील जास्तीचे यूरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.3. भाज्यांचा समावेश: दुधी भोपळा, काकडी यांसारख्या पाणीदार भाज्यांचा आहारात समावेश करा.4. मांसाहार टाळा: जर तुम्ही मांसाहारी असाल, तर रेड मीट आणि कलेजी यांसारखे पदार्थ पूर्णपणे टाळा.
advertisement








