advertisement

'माझं आयुष्य...' दीपेश शर्मासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली शमिता, सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण

Last Updated:
Shamita Shetty Dating Rumours: प्रसिद्ध टेक्नो आर्टिस्ट आणि उद्योजक दीपेश शर्मा याच्याशी शमिताचं नाव जोडलं गेल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र, शमिताने या प्रकरणावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
1/8
बॉलीवूडची 'शरारा गर्ल' शमिता शेट्टी सध्या तिच्या ४७ व्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. पण या आनंदाच्या वातावरणात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक अशी अफवा पसरली आणि बघता बघता सगळीकडे फक्त शमिताचीच चर्चा रंगू लागली.

2/8
प्रसिद्ध टेक्नो आर्टिस्ट आणि उद्योजक दीपेश शर्मा याच्याशी शमिताचं नाव जोडलं गेल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र, शांत राहण्याऐवजी शमिताने या प्रकरणावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.

3/8
या वादाची ठिणगी पडली ती दीपेश शर्माच्या एका पोस्टमुळे. शमिताच्या ४७ व्या वाढदिवशी दीपेशने तिच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले होते.
या वादाची ठिणगी पडली ती दीपेश शर्माच्या एका पोस्टमुळे. शमिताच्या ४७ व्या वाढदिवशी दीपेशने तिच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले होते.
advertisement
4/8
त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं,
त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "जिच्यामुळे मला सतत हसू येतं, त्या माझ्या खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! जिला माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी माहीत आहेत आणि तरीही ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे. लव्ह यू, माय शॅमस्टर!"
advertisement
5/8
या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीदेखील दिसत होती. दीपेशने वापरलेल्या 'लव्ह यू' या शब्दाचा नेटकऱ्यांनी वेगळा अर्थ काढला आणि चर्चांना उधाण आलं.
या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीदेखील दिसत होती. दीपेशने वापरलेल्या 'लव्ह यू' या शब्दाचा नेटकऱ्यांनी वेगळा अर्थ काढला आणि चर्चांना उधाण आलं.
advertisement
6/8
वाढदिवसाच्या फोटोंनंतर सुरू झालेल्या डेटिंगच्या चर्चा पाहून शमिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली,
वाढदिवसाच्या फोटोंनंतर सुरू झालेल्या डेटिंगच्या चर्चा पाहून शमिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, "मी सिंगल आहे आणि अत्यंत शांततेत माझं आयुष्य जगतेय. संकुचित विचार करणे थांबवा, प्रामाणिक मैत्रीचा चुकीचा अर्थ लावू नका. हा निव्वळ मूर्खपणा आह" शमिताच्या या स्टोरीमुळे तिच्या नात्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
advertisement
7/8
ज्या दीपेशसोबत शमिताचं नाव जोडलं गेलं, तो ग्लॅमर वर्ल्डमध्ये चांगलाच सक्रिय आहे. दीपेश हा केवळ टेक्नो आर्टिस्ट नसून 'मिलाग्रो' आणि 'द कॉकटेल रूम' यांसारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंट्सचा सह-संस्थापक आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे २ लाखांच्या जवळपास फॉलोअर्स असून त्याचे सलमान खान आणि संजय दत्त यांसारख्या बड्या सेलिब्रिटींसोबतही जवळचे संबंध आहेत.

8/8
शमिता शेट्टी याआधी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये असताना अभिनेता राकेश बापटच्या प्रेमात पडली होती. २०२२ मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यावेळी शमिताने लिहिलं होतं की,
शमिता शेट्टी याआधी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये असताना अभिनेता राकेश बापटच्या प्रेमात पडली होती. २०२२ मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यावेळी शमिताने लिहिलं होतं की, "आम्ही आता एकत्र नाही, पण आमच्या वैयक्तिक प्रवासासाठी आम्हाला तुमचं प्रेम हवं आहे." तेव्हापासून शमिता कोणत्याही गंभीर नात्यात नसल्याचं स्पष्ट होतंय.
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement