advertisement

India Border : भारताच्या बॉर्डरवर लटकवलेल्या आहेत काचेच्या रिकाम्या बाटल्या, कारण काय?

Last Updated:
Empty Glass Bottles On Indian border : भारताच्या सीमेवर सैनिक काटेरी तारांच्या कुंपणावर रिकाम्या काचेच्या बाटल्या लटकवतात, जे दिसायला साधं वाटत असलं तरी आजही ते सीमा सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
1/5
भारताची बॉर्डर पाहिली तर तिथं काटेरी तारेचं कुंपण असतं हे तुम्हाला माहितीच आहे. प्रत्यक्षात नाही तर फिल्ममध्ये तरी तुम्ही हे पाहिलंच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? या तारेच्या कुंपणाला काचेच्या बाटल्याही लटकवल्या जातात. 

2/5
भारताच्या लांब सीमा घनदाट जंगलं, डोंगराळ प्रदेश आणि दुर्गम भागातून जातात. तिथं या काचेच्या बाटल्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका निभावतात. तुमच्या आमच्यासाठी भंगार असलेल्या या बाटल्या म्हणजे सैनिकांसाठी एक इशारा देणारा, त्यांना सतर्क करणारा अलार्म आहे. 

3/5
भारताच्या बॉर्डचा भाग असा आहे, जिथं सर्वत्र हाय-टेक सेन्सर किंवा कॅमेरे बसवणं सोपं नाही. सीमेच्या अनेक भागात वीज नेहमीच असते असं नाही. पाऊस, बर्फवृष्टी किंवा खराब हवामानात हाय-टेक सिस्टम बिघडू शकते.  अशा परिस्थिती काचेच्या बाटल्या उपयोगी ठरतात. त्यांना वीज, बॅटरी किंवा नेटवर्कची गरज नसते. ते कोणत्याही हवामानात 24 तास कार्यरत असतात. 

4/5
महागडे सेन्सर्स, थर्मल कॅमेरे आणि अलार्म सिस्टीमच्या तुलनेत ही पद्धत खूपच किफायतशीर आहे. रिकाम्या काचेच्या बाटल्या सहज उपलब्ध असतात आणि त्या बसवण्यासाठी खूप कमी खर्च येतो.

5/5
जेव्हा एखादी व्यक्ती, घुसखोर किंवा वन्य प्राणी तारेला स्पर्श करतात किंवा ती ओलांडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लटकलेल्या बाटल्या एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे मोठा आवाज होतो. रात्रीच्या शांततेत हा आवाज दूरवर ऐकू येतो.  सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी ते एक इशारा म्हणून काम करते, ज्यामुळे ते लगेच सतर्क होतात.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement