मंदार, डोळे भरून आले..! सख्खा भाऊ राहिला बाजूला, मंदार शिंदेंसाठी किरण माने भावुक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा लहान भाऊ दिग्दर्शक मंदार शिंदे अनेक कौटुंबिक अडचणी आणि संघर्षामध्ये अडकले आहेत. टॅलेंट असूनही त्यांना फिल्म इंडस्ट्रीत कोणी काम देत नाहीये. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं. त्यांचा संघर्ष ऐकून अभिनेते किरण माने भावुक झालेत.
advertisement
advertisement
मंदार शिंदे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांच्या मुलाचा अपघात. 2019 मध्ये त्यांच्या मुलाला अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यानंतर त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च सुरू आहे. या परिस्थितीत स्थिर उत्पन्नाची गरज असल्याने मंदार यांनी एका व्यावसायिकाकडे ड्रायव्हिंगचा जॉब स्वीकारला.
advertisement
advertisement
advertisement
अभिनेते किरण माने मंदार शिंदे यांचा संघर्ष आणि कहाणी ऐकून भावुक झाले. त्यांनी सोशल मीडियावर मंदार शिंदेंसाठी पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "मंदार शिंदेची मुलाखत पाहिली. अनेक वेळा डोळे भरून आले. आवंढा दाटून आला. पण तो अजूनही जिद्दीने परिस्थितीशी झुंज देतो आहे ती पाहून त्याला मनोमन सलाम ठोकला. मंदार, तू लवकरच सगळ्या संकटातून बाहेर पडणार. आमच्या सदिच्छा तुझ्या पाठीशी आहेत."
advertisement








