advertisement

आमचं शोषण होतं..! अरिजीतची रिटायरमेन्ट; अभिजीत सावंतने सांगितलं प्लेबॅक सिंगर्सचं दु:ख

Last Updated:
अरिजीत सिंगच्या रिटायरमेन्टनंचर मराठमोळा गायक अभिजीत सावंतने बॉलीवूडमधील गायकांचे शोषण, मानधन आणि रॉयल्टीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
1/8
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याने प्लेबॅक सिंगिंगला रामराम केलं. त्याच्या रिटायरमेन्टच्या घोषणेनंतर संगीत उद्योगाला अस्वस्थ करणारे प्रश्न भेडसावत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्काच बसला आहे.

2/8
 हिंदी चित्रपटसृष्टीतील गायकांना मिळणारी वागणूक, मानधन आणि मूल्य याबद्दल अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशातच इंडियन आयडियलचा विजेता मराठमोळा अभिजीत सावंत याने गायकांचे अनेक प्रश्न पुढे आणले आहेत. 

3/8
अभिजीत सावंतवे चित्रपट संगीताच्या अर्थशास्त्राबद्दल आणि पार्श्वगायकांना होणाऱ्या अन्यायांबद्दल स्पष्टपणे सांगितलं. पेंटराईज स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अभिजीत यांना बॉलीवूडमधील मानधन आणि रॉयल्टीबद्दलही भाष्य केलं. 

4/8
इंडस्ट्रित काही अलिखित नियम असल्याचं अभिजीतनं सांगितलं. तो म्हणाला लोकांना गायकांनी चित्रपटापेक्षा जास्त प्रसिद्ध व्हावे असे वाटत नाही. म्हणूनच त्यांना एक निश्चित रक्कम दिली जाते. संगीतकारांना अजूनही चित्रपट संगीतासाठी रॉयल्टी मिळत नाही.

5/8
 जसं बिद्दू यांनी 'लफ्जों में कह ना सकूं' या गाण्यावर काम केलं. त्यानंतर त्यांनी  वेस्टमध्येही काही गाणी केली होती. त्या दोन गाण्यांमधूनच त्यांना इतकी रॉयल्टी मिळते की त्या पैशावर ते पूर्ण आयुष्य काढू शकतात. आणि आम्हाला तर रोजीरोटीसाठीही पुरेसे पैसे मिळत नाहीत. 

6/8
 "इंडस्ट्रीमध्ये अशी अवस्था निर्माण केली आहे की गायक स्वत: लोभी होत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की जर हे गाणे माझ्या आवाजात, मोठ्या स्टारच्या लिप-सिंकिंगसह रिलीज झाले तर मी आयुष्यभर हे गाणे वापरू शकतो."

7/8
"गायकांना पैशाची इच्छा नसते त्यांना फक्त ते गाणं किंवा एखाद्या विशिष्ट निर्मात्यासोबत काम करायचं असतं.  आम्हाला जे काही पैसे दिले जातात ते आम्ही स्वीकारतो कारण जर आम्ही तसं केलं नाही तर दुसरं कोणीतरी करेल. यात आमचं खूप शोषण केलं जातं.
advertisement
8/8
अभिजीतनं ब्रिटिश-इंग्लिश संगीतकार आणि गीतकार बिद्दू यांच्याबद्दल सांगितलं ते खरं आहे. 2011साली हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की,  Kung Fu Fighting’ आणि नाझिया व झोहेबसाठी Disco Deewane हा प्रसिद्ध पाकिस्तानी अल्बम प्रोड्यूस केला होता. त्या गाण्यांचे आजही प्रत्येक महिन्याला 60k–70k पाउंड इतकी रॉयल्टी मिळते. म्हणजेच आजच्या मार्केट प्राइजनुसार, 74 ते 84 लाख रुपये. 

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement