आ गये... वाल्मिकची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या सनी भैय्याचा नवा व्हिडीओ समोर
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बीडमध्ये मकोका अंतर्गत कारवाई झालेला सनी आठवले हा सध्या बीड कारागृहात आहे.
बीड: बीड जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या आरोपींच्या सोशल मीडियावरील रिल्स आणि पोस्ट्स सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. अशाच एका गंभीर प्रकरणात मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपीची रील समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
गोळीबाराच्या गंभीर प्रकरणात बीडमध्ये मकोका अंतर्गत कारवाई झालेला सनी आठवले हा सध्या बीड कारागृहात आहे. काही दिवसांपूर्वी बीड पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक करून बीडमध्ये आणले होते. या दरम्यान, त्याला न्यायालयात हजर करण्यात येत असताना त्याच्या काही साथीदारांनी व्हिडीओ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही व्हिडीओ रील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
या रिलमध्ये “बडे दिनों से इंतजार था कि कब आयेंगे… आखिर आ गये” अशा आशयाचे शब्द वापरण्यात आले असून, यामागे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे मकोका अंतर्गत अटक असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना किंवा न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारे त्याचे चित्रीकरण होणे आणि ते खुलेआम प्रसारित होणे, यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
बीड जिल्ह्यात यापूर्वीही अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींच्या रिल्स, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्यामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची टीका वारंवार होत आहे. कायद्याची भीती न बाळगता आरोपी किंवा त्यांचे समर्थक समाज माध्यमांचा वापर करून दहशत निर्माण करत असल्याचे चित्र दिसत आहे.
काय कठोर कारवाई करणार?
advertisement
या प्रकरणात संबंधित रील कोणी बनवली, चित्रीकरणासाठी परवानगी होती का, तसेच पोलिस बंदोबस्तात हा प्रकार कसा घडला, याचा तपास होणे अपेक्षित आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर बीड पोलीस कोणती कारवाई करतात, आरोपीच्या साथीदारांवर गुन्हा दाखल होतो का, तसेच सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
advertisement
कोण आहे सनी आठवले?
बीडमधील कुख्यात गुंड म्हणून सनी आठवलेची ओळख आहे. खंडणी, मारहाण, बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्याची सध्या नोंद आहे. मारहाण करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गोळीबार, गावठी पिस्तूल बाळगणे अशा प्रकारच्या गंभीर घटनांचे गुन्हे यापूर्वीही आठवले गँगवर दाखल आहेत. महत्त्वाचे म्हणजे अक्षय आठवले, सनी आठवले आणि आशिष आठवले हे तिघे सख्खे भाऊ या गँगमध्ये आहेत. या तीन भावांवर अनेक गुन्हे आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 4:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आ गये... वाल्मिकची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या सनी भैय्याचा नवा व्हिडीओ समोर







