लग्नाचा 25वा वाढदिवस, 43 पुरुष अन् 38 महिलांचे बंद दाराआड सुरू होते नको नको प्रकार; हाय-सोसायटी लोकांच्या 'प्रायव्हेट' पार्टीवर रेड
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Police Raided High-Profile Party अहमदाबादमधील एक हाय-सोसायटी लोकांच्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला . सानंद येथील वीकेंड होमवर पोलिसांनी छापा टाकत बेकायदेशीर दारू आणि हुक्का पार्टीचा पर्दाफाश केला असून 81 जणांना ताब्यात घेतले आहे.
अहमदाबाद: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये उच्चभ्रू वर्तुळाला हादरवणारी घटना बुधवारी समोर आली. एका प्रतिष्ठित कुटुंबात सुरू असलेल्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या सोहळ्यावर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी छापा टाकला. सानंद परिसरातील निर्वाणा ग्रीन्स वीकेंड होम्स येथे सुरू असलेल्या एका आलिशान पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत बेकायदेशीर दारू आणि हुक्का पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 81 जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये शहरातील नामवंत बिल्डर, डॉक्टर आणि व्यावसायिकांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आलिशान पार्टीचा थरारक पर्दाफाश
मिळालेल्या गुप्त माहितीनंतर सानंद पोलिसांनी या वीकेंड होमवर धाड टाकली. आत प्रवेश करताच पोलिसांना भव्य जेवणाची मांडणी, केकसाठी खास 11 टेबल्स, तसेच परदेशी दारू आणि हुक्क्यांची स्वतंत्र व्यवस्था दिसून आली. पार्टीतील बहुतांश पाहुण्यांचे वय 35 ते 45 दरम्यान होते. पोलिसांनी छापा टाकताच एकच गोंधळ उडाला आणि अनेक जण पळण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
advertisement
दारू, हुक्का आणि लक्झरी गाड्यांचा साठा जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी परदेशी दारूच्या अनेक बाटल्या, 10 हून अधिक हुक्का पाइप्स, तसेच कार्यक्रमस्थळी उभ्या असलेल्या 20 पेक्षा जास्त लक्झरी गाड्या जप्त केल्या. या सर्व व्यवस्थांवरून हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, शहरातील श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांसाठीच ही पार्टी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
advertisement
कोण कोण ताब्यात?
सानंद पोलिसांच्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या 81 जणांमध्ये 43 पुरुष आणि 38 महिलांचा समावेश आहे. नियमांनुसार पुरुष पाहुण्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तर महिलांना कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले. उपस्थितांमध्ये धनाढ्य कुटुंबातील वारसदार, तसेच वैद्यकीय आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
advertisement
तपास अधिक तीव्र
या प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र करण्यात आला आहे. बेकायदेशीर दारू आणि हुक्क्यांचा पुरवठा कुठून झाला, तसेच या पार्टीचा मुख्य आयोजक कोण होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. सानंद परिसरात अलीकडे खासगी फार्महाऊस आणि वीकेंड होम्सवर अशा प्रकारच्या बेकायदेशीर पार्ट्यांचे प्रमाण वाढत असल्याने, पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्पष्ट केले आहे.
advertisement
जप्त केलेल्या गाड्या आणि साहित्य पोलिसांच्या ताब्यात असून, सर्व आरोपींची पार्श्वभूमी तपासल्यानंतर दारूबंदी कायद्यानुसार (Prohibition Act) गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे अहमदाबादच्या उच्चभ्रू समाजात मोठी खळबळ माजली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 4:37 PM IST
मराठी बातम्या/देश/
लग्नाचा 25वा वाढदिवस, 43 पुरुष अन् 38 महिलांचे बंद दाराआड सुरू होते नको नको प्रकार; हाय-सोसायटी लोकांच्या 'प्रायव्हेट' पार्टीवर रेड









