advertisement

Do You Know : थंडी लागली की दात का वाजतात? 99 टक्के लोकांना याचं उत्तर माहितच नसेल

Last Updated:

पण कधी विचार केला आहे का, की थंडीचा आणि दातांचा काय संबंध? दात वाजणं ही केवळ एक शरीराची प्रतिक्रिया आहे की त्यामागे काही खास उद्देश असतो? चला, यामागचं रंजक शास्त्रीय कारण जाणून घेऊया.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की, रात्रीच्या वेळी, सकाळी उठल्यावर किंवा थंड पाण्याने आंघोळ केल्यावर आपल्या सर्वांच्या बाबतीत एक गोष्ट हमखास घडते, ती म्हणजे दात वाजणे. कधीकधी हे दात इतक्या जोरात वाजतात की समोरच्या व्यक्तीलाही त्याचा आवाज ऐकू जातो. आपण कितीही प्रयत्न केला तरी हे दात वाजणं आपल्याला सहजासहजी थांबवता येत नाही.
पण कधी विचार केला आहे का, की थंडीचा आणि दातांचा काय संबंध? दात वाजणं ही केवळ एक शरीराची प्रतिक्रिया आहे की त्यामागे काही खास उद्देश असतो? चला, यामागचं रंजक शास्त्रीय कारण जाणून घेऊया.
शरीराची 'थर्मोस्टॅट' यंत्रणा
आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअस (98.6° फॅरनहाइट) इतके स्थिर असते. जेव्हा बाहेरील वातावरण खूप थंड होते, तेव्हा शरीराचे तापमान कमी होऊ लागते. अशा वेळी मेंदूतील 'हायपोथॅलॅमस' (Hypothalamus) हा भाग सक्रिय होतो. हा भाग शरीराच्या अंतर्गत तापमानावर नियंत्रण ठेवणाऱ्या 'थर्मोस्टॅट'प्रमाणे काम करतो.
advertisement
स्नायूंची हालचाल आणि ऊर्जेची निर्मिती
जेव्हा शरीराला वाटते की तापमान खूप कमी होत आहे, तेव्हा मेंदू आपल्या स्नायूंना वेगाने आकुंचन आणि प्रसरण (Contract and Relax) पावण्याचे आदेश देतो. या प्रक्रियेला आपण 'थंडी वाजून येणे' (Shivering) असे म्हणतो. स्नायू जेव्हा इतक्या वेगाने हालचाल करतात, तेव्हा शरीरात उष्णता (Heat) निर्माण होते. ही उष्णता शरीराचे तापमान पुन्हा सामान्य स्तरावर नेण्यास मदत करते.
advertisement
जबड्याचे स्नायू आणि दात
थंडी वाजून येण्याची ही प्रक्रिया संपूर्ण शरीरात घडत असते, पण त्याचे परिणाम आपल्या जबड्यावर सर्वात आधी आणि स्पष्टपणे जाणवतात. आपल्या जबड्याचे स्नायू अत्यंत लवचिक असतात. जेव्हा हे स्नायू थंडीमुळे वेगाने हालचाल करू लागतात, तेव्हा वरचा आणि खालचा जबडा एकमेकांवर आदळतो आणि 'कडकड' असा आवाज येतो, ज्याला आपण 'दात वाजणे' म्हणतो.
advertisement
हे दात वाजणं आपल्या फायद्याचंच आहे
दात वाजणे किंवा थरथरणे ही खरं तर शरीराची एक 'संरक्षण यंत्रणा' आहे. हे शरीराचे संकेत आहेत की, आता बाहेरची थंडी सहन करण्याच्या मर्यादेबाहेर जात आहे आणि शरीराला उबदार कपड्यांची किंवा ऊर्जेची गरज आहे. ही थरथर शरीराला तात्पुरती उब मिळवून देण्यासाठी निसर्गाने दिलेली एक देणगीच आहे.
advertisement
केवळ थंडीच नाही, तर 'हे' देखील आहे कारण
केवळ थंडीमुळेच दात वाजतात असे नाही, तर इतर काही कारणांमुळेही हे घडू शकते:
भीती किंवा तणाव: जेव्हा आपण खूप घाबरतो, तेव्हा शरीरात ॲड्रेनालिन (Adrenaline) हार्मोन वाढते, ज्यामुळे स्नायू थरथरू लागतात आणि दात वाजतात.
ताप: शरीरात इन्फेक्शन झाल्यावर जेव्हा ताप चढतो, तेव्हा शरीर अंतर्गत तापमान वाढवण्यासाठी थरथरते, ज्याला आपण 'हुडहुडी' भरणे म्हणतो.
advertisement
थोडक्यात सांगायचं तर दात वाजणे ही तुमच्या शरीराची एक 'नॅचरल हीटिंग सिस्टम' आहे. त्यामुळे जेव्हा पुढच्या वेळी तुझे दात वाजतील, तेव्हा समजून जा की तुमचं शरीर तुम्हाला थंडीपासून वाचवण्यासाठी मेहनत करत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Do You Know : थंडी लागली की दात का वाजतात? 99 टक्के लोकांना याचं उत्तर माहितच नसेल
Next Article
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement