मोठी बातमी! राज्यातील 'या' तीन प्रभागामधील निवडणूक थांबवा, निवडणूक आयोगाचा आदेश

Last Updated:

प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असताना निवडणूक आयोगाने तीन प्रभागातील निवडणुकांना स्थगिती दिली आहे.

News18
News18
मुंबई:  राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरराज्यातील तीन प्रभागामधील निवडणूक थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. उमेदवारांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
राज्यातील 246 नगरपालिका आणि 46 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, या उत्साहाच्या वातावरणात काही ठिकाणी उमेदवारांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली असून, निवडणूक आयोगाने संबंधित प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement

काय आहे निवडणूक आयोगाचा आदेश?

राज्यातील तीन प्रभागामधील निवडणूक थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे आयोगाने हा निर्णय घेतला आहे. पिंपळनेरमधील प्रभाग 2, मनमाडमधील प्रभाग 10 आणि गेवराई मधील प्रभाग 11 मधील निवडणुका स्थगित करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस मात्र कुठलीही स्थगिती नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement

कोणत्या परिषदेसाठी घेतला निर्णय?

धुळे, नाशिक, बीड जिल्ह्यातील नगपरिषदेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपळनेर, मनमाड आणि गेवराई नगरपंचायतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. धुळ्याच्या पिंपळनेर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील पाथरे कुसुमबाई खडू, नाशिकच्या मनमाज नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मधील नितीन अनिल वाघमारे, बीडच्या गेवराई नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ११ मधील दूरदानाबेगम सलीम फारूकी यांचे निधन झाल्याने निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.
advertisement

काय आहे शासन आदेश? 

निवडणुकांध्ये वैधरित्या निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निवडणुकांमध्ये संदर्भाधीन कार्यक्रमान्वये
खाली नमूद केल्यानुसार सदस्यपदाच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशित निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांचा मृत्यू झाला असल्याने त्या प्रभागामधील त्या एका यावी किंवा पुर्ण प्रभागासाठी निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात जागेसाठी थांबविण्यात यावी याबाबत आयोगाचे आदेश होणेस विनंती केली आहे. निवडणूक नियम, १९६६ च्या नियम २३ अंतर्गत नमुद तरतुदी आणि महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, आणि औद्योगिक नगरी १९६५ च्या कलम १० (१)(२) नगरपंचायती महाराष्ट्र नगरपरिषदा, दोन्ही जागांकरता विभागणी दोन जागांमध्ये करण्यात येत असल्याने च्या तरतुदींनुसार प्रभागाची
advertisement
प्रक्रिया निवडणूक निवडणूक प्रक्रिया थांबविणे क्रमप्राप्त आहे. परंतु अध्यक्ष पदाच्या या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात येत नसून अध्यक्षपदाची या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया नियोजीत कार्यक्रमानुसार सुरू होईल
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! राज्यातील 'या' तीन प्रभागामधील निवडणूक थांबवा, निवडणूक आयोगाचा आदेश
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement