advertisement

Hingoli: आधी ताप, नंतर उलट्या, दोन दिवसांमध्ये 2 किशोरवयीन मुलांचा मृत्यू, हिंगोलीत खळबळ

Last Updated:

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव इथं ही घटना घडली आहे. दोन किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

News18
News18
मनीष खरात, प्रतिनिधी
हिंगोली: हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  पुसेगाव तालुक्यामध्ये मागील दोन दिवसात २ किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीआाहे. दोन्ही मुलांना ताप आला होता, त्यानंतर एकापाठोपाठ दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.  गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव इथं ही घटना घडली आहे. दोन किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी एका मुलाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आज गुरुवारी आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या दोन्ही मुलांना ताप आला होता, अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. बुधवारी नकुल श्रीधर देशमुख या सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. नकुलला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. पण उलटी झाल्याने त्याची प्रकृती आणखी खालावली, त्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान, नकुलचा मृत्यू झाला.
advertisement
दुसऱ्या मुलाचा मृत्यू
तर आज गुरुवारी नैतिक ज्ञानेश्वर गोरे या 17 वर्षीय किशोरवयीन मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. नैतिकला सुद्धा आधी ताप आला, त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या मुलाचा देखील ताप येऊन मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. दरम्यान नेमकं या मुलांचे मृत्यू ताप आल्यामुळे झाले की आणखी कुठला आजार आहे. या सर्वांची चौकशी आरोग्य विभाग करत आहे.
advertisement
आरोग्य विभागाचं पथक गावात दाखल
आज आरोग्य विभागाचे पथक पुसेगाव या गावात पोहोचलं असून आरोग्य विभागाच्या पथकाकडून गावात काही ताप आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गावातील पिण्याच्या पाणी स्रोतांच्या नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आरोग्य पथकाकडून या गावात आवश्यक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. कोणताही साथ रोग नसल्याची परंतु प्रतिबंधात्मक खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hingoli: आधी ताप, नंतर उलट्या, दोन दिवसांमध्ये 2 किशोरवयीन मुलांचा मृत्यू, हिंगोलीत खळबळ
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement