advertisement

Abhishek Sharma : नेमकं काय चुकतंय? हॉटेलमधून वेस्ट इंडिजची बॅटिंग बघितली तर अभिषेकला समजणार!

Last Updated:

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. ग्रुप स्टेजच्या 4 सामन्यांपैकी अभिषेक 3 मॅचमध्ये खेळला, पण या तिन्ही सामन्यांमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला.

नेमकं काय चुकतंय? हॉटेलमधून वेस्ट इंडिजची बॅटिंग बघितली तर अभिषेकला समजणार!
नेमकं काय चुकतंय? हॉटेलमधून वेस्ट इंडिजची बॅटिंग बघितली तर अभिषेकला समजणार!
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया क्वालिफाय होणार का नाही? याची धाकधूक अजूनही कायम आहे. भारतीय टीमने स्पर्धेतल्या ग्रुप स्टेजमधल्या सर्व 4 मॅच जिंकल्या पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा 76 रननी धक्कादायक पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेटलाही मोठा धक्का बसला, ज्यामुळे आता भारतीय टीमला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी दुसऱ्या टीमवर अवलंबून राहावं लागणार आहे.

अभिषेकच्या फॉर्मने चिंता

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. ग्रुप स्टेजच्या 4 सामन्यांपैकी अभिषेक 3 मॅचमध्ये खेळला, पण या तिन्ही सामन्यांमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 15 रनची खेळी केली, पण या 15 रन करतानाही त्याला संघर्ष करावा लागला. या कामगिरीनंतर अभिषेकच्या टेकनिकवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्या बॉलपासूनच धोका पत्करायची गरज आहे का? असा प्रश्नही क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहते विचारत आहेत.
advertisement

वेस्ट इंडिजच्या पिंच हिटरकडून अभिषेक शिकणार?

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पिंच हिटर रोमारियो शेफर्ड याने केलेल्या बॅटिंगमधून तरी अभिषेक शर्मा शिकणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजची अवस्था 83/7 अशी झाली होती, पण त्यानंतर रोमारियो शेफर्ड याने जेसन होल्डरच्या मदतीने वेस्ट इंडिजला अडचणीतून बाहेर काढलं.
advertisement
रोमारियो शेफर्डने 37 बॉलमध्ये 140.54 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 52 रन केले, ज्यात 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. तर जेसन होल्डरने 31 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 49 रनची खेळी केली. होल्डर आणि शेफर्ड यांच्यात 8व्या विकेटसाठी 89 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 176 रन केले.
advertisement
रोमारियो शेफर्ड हा नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आला, जेव्हा त्याची टीम अडचणीत होती. पहिल्या बॉलपासूनच आक्रमण न करता शेफर्डने खेळपट्टीवर थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर पॉवर हिटिंगला सुरूवात केली, ज्यामुळे वेस्ट इंडिज सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : नेमकं काय चुकतंय? हॉटेलमधून वेस्ट इंडिजची बॅटिंग बघितली तर अभिषेकला समजणार!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement