advertisement

Sunetra Pawar: प्रफुल पटेल आग्रही, १५ आमदारांचीही साथ, पण सुनेत्रा पवार भारी पडल्या, NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कशी झाली निवड?

Last Updated:

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी मांडला. त्यानंतर आवाजी मतदानाने त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार
मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणे पुढे येऊन उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यापाठोपाठ त्यांनी पक्षाची जबाबदारीही स्वत:कडे घेतली आहे. सुनेत्रा पवार यांची एकमताने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावे, अशी प्रफुल पटेल यांची इच्छा होती. पक्षातील जवळपास १५ आमदारांचीही त्यांना पडद्याआडून साथ होती. परंतु पवारांच्या पक्षाच्या पवारच अध्यक्ष हवा, असा 'महाशक्ती'चा निरोप असल्याने पटेल यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. अखेर पक्षाच्या संविधानानुसार सुनेत्रा पवार यांची गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईतील वरळी डोममधील हॉलमध्ये झाली. या बैठकीला राज्यातील आणि देशभरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, पार्थ पवार हे बैठकीला उपस्थित होते. आवाजी मतदानाने सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली.
advertisement
सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हातात घ्यावीत, असे पक्षातील अजित पवार यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे होते. तर प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, यासाठी काही आमदारांना तयार केले गेले होते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. परंतु पवारांच्या पक्षाचा पवारच अध्यक्ष व्हावा, अशी सूचना दिल्लीतून आल्याने अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून पटेल यांचे नाव आपोपाप मागे पडले. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबामागे सहानुभूती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्रे हातात घ्यावीत, त्याचा पक्षाला फायदा होईल तसेच पक्षातील लोकप्रतिनिधी एकसंध राहतील, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे होते. पक्षातील सर्वांच्या विनंतीला मान देऊन सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली.
advertisement

प्रफुल पटेल यांनीच सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, सुनील तटकरे यांचे अनुमोदन

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यांच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: प्रफुल पटेल आग्रही, १५ आमदारांचीही साथ, पण सुनेत्रा पवार भारी पडल्या, NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कशी झाली निवड?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement