advertisement

गडचिरोली झेडपीच्या सीईओंचा 380 किमीचा प्रवास, अतिदुर्गम भागात डेंग्यूची 'ऑन द स्पॉट' पाहणी

Last Updated:

गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयासह  राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मोयाबीनपेठा परिसरात डेंग्यूच्या रोगाने थैमान घातले आहे.

गडचिरोली झेडपीच्या सीईओ ग्राऊंडवर
गडचिरोली झेडपीच्या सीईओ ग्राऊंडवर
महेश तिवारी, प्रतिनिधी
गडचिरोली, 14 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयासह  राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मोयाबीनपेठा परिसरात डेंग्यूच्या रोगाने थैमान घातले आहे. या डेंग्यूच्या रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या मोयाबीन पेठाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या रिक्त पदांच्या समस्येमुळे रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे, दरम्यान या भागात पसरलेल्या डेंग्यूच्या रोगाची तसंच आरोग्य केंद्रातील समस्यांची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद येथे नुकत्याच रुजू झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गडचिरोलीहून थेट मोयाबीनपेठा गाठून तेथील गंभीर परिस्थिती समजून घेतली.
advertisement
एका प्राथमिक आरोग्य केंद्राची समस्या आणि नागरीकाना होणारा ञास यासाठी जाणे येणे मिळुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी एकाच दिवशी तब्बल 380 किमीचा प्रवास केला. अतिदुर्गम भागातील 19 गावासाठी समस्या समजून घेण्यासाठी एकाच दिवसात इतका प्रवास करुन मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंह अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेला सक्रिय करण्याचे संकेत दिले आहेत.
advertisement
सिरोंचा तालुका राज्याच्या शेवटच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 220 किलोमीटर अंतरावर असलेला तालुका आहे. या तालुक्यातत श्रीलंका बेट अशी ओळख असलेला रेगुंटा आणि मोयाबीन पेटा हा भाग आहे. तालुका मुख्यालयापासून 60 तर जिल्हा मुख्यालयापासून तब्बल 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात अनेक समस्या असून विकासापासून हा भाग वंचित आहे. यात मोयाबीन पेठा प्राथमिक आरोग्य केंद्र असून या गावांतर्गत 19 गावे येतात. या भागात सध्या डेंग्यू रोगाने थैमान घातले आहे. मोयाबीन पेठासह नरसिंहापल्ली परिसरात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आहेत.
advertisement
ताप असलेल्या या रुग्णांना मोयाबीन पेठाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन वार्डमध्ये डेंग्यूचे रुग्ण भरुन आहेत. जागा नसल्याने रुग्णांना जमिनीवर टाकून उपचार केले जात आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल 36 पदे मंजूर असली तरी यात केवळ 15 पदे भरली आहेत. उर्वरीत तब्बल 21 पदे रिकामी आहेत. यात कंपाऊंडर सह प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत .या रिक्त पदांमुळे डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
advertisement
मोयाबीन पेठाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या पाच उपकेंद्रामधील परिचारिकेची पदे रिक्त आहेत, त्यामुळे परिसरातल्या गावांमध्ये नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच डेंग्यूच्या रोकथामासाठी करावयाच्या उपायोजनांकडे स्थानिक पातळीवर दुर्लक्ष झाल्याने या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. या संदर्भातली माहिती दूरध्वनीवरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना कळवण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला माहिती घेण्याचे निर्देश दिले आणि आज सकाळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री यांच्यासह काही अधिकाऱ्यांना घेऊन थेट मोयाबीनपेठाला मुख्य कार्यकारी अधिकारी पोहोचल्या.
advertisement
गडचिरोली ते मोयाबीन पेटा हा प्रवास आलापल्ली सिरोंचा मार्ग खराब असल्याने सोपा नव्हता. अनेक ठिकाणी रस्तेही वाहून गेलेले आहेत मात्र अहेरीला पोहोचल्यानंतर वेंकटा पूर मार्गे अतिदुर्गम भागातून मार्ग काढत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह 180 किलोमीटरचा प्रवास करून मोयाबीन पेटा येथे पोहोचल्या, तेथे त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांची संवाद साधला. रिक्त पदाची माहिती घेतली, रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दिले. तेथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अवस्थेची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर डेंग्यू ज्या कारणामुळे उद्भवत आहे त्या नरसिंहपल्ली येथील तीन पडीक विहिरींची पाहणी ही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केली. त्या ठिकाणी पूर्णवेळ ग्रामसेवकाची नियुक्ती करून पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे पडीक विहिरींमधील डासांची पैदास थांबवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
advertisement
रेगुंठा मोयाबीनपेठा हा अत्यंत उपेक्षित भाग असून वरिष्ठ अधिका-यांचे दौरे दुर्मिळ असतात, या भागात येण्या जाण्यासाठी आयुषी सिंह यांना तब्बल 380 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन सोडवण्यासाठी धाऊन जात आदिवासी भागातील  समस्यांकडे गांभीर्याने लक्ष न देणाऱ्या स्थानिक यंत्रणेला यापुढील काळात नागरीकांच्या समस्यांसाठी सक्रिय रहावे लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गडचिरोली झेडपीच्या सीईओंचा 380 किमीचा प्रवास, अतिदुर्गम भागात डेंग्यूची 'ऑन द स्पॉट' पाहणी
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement