आजोबांसाठी काय पण...सांगोल्यात नातवाने असं काही केलं की, अख्खं गावं म्हणालं लयं भारी
- Published by:Prachi Amale
- Reported by:Virendrasigh Utpat
Last Updated:
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत आजोबा आणि नातू असे दोघेही एकाच वेळेला निवडणूक लढवणार असल्याने चर्चांना उधाण आले.
सोलापूर : सांगोला नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. सासू, पुतण्या, सून, लेक, बायको, जावा-जावा अशा नात्यांभोवती फिरणाऱ्या निवडणुकीत सांगोल्यात आजोबा वि. नातू अशी लढत जोरदार चर्चेचा विषय आहे. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत आजोबा आणि नातू असे दोघेही एकाच वेळेला निवडणूक लढवणार होते. मात्र आजोबासाठी नातवाने माघार घेतल्याने याची सध्या पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
राजकीय नेते हे आपलं वैयक्तिक आयुष्य राजकारणापासून अनेकदा वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण, काहीही केलं तरीही असा एक योगायोग येतोच जिथे राजकारण्यांचं वैयक्तिक आयुष्य समोर येतंच. असाच काहीसा प्रकार सांगोल्यात पाहायला मिळाल आहे. आजोबा असणारे मारुती बनकर भाजपकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचे नातू ज्योतिरादित्य बनकर हे प्रभाग पाच वाजून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार होते. 73 वर्षीय मारुती बनकर हे सर्वात ज्येष्ठ वयाचे उमेदवार आहेत. तर 21 वर्षे ज्योतिरादित्य सर्वात तरुण उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते.
advertisement
सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात लहान उमेदवार
मात्र एकाच वेळेला आजोबा आणि नातू हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असतानाच आजोबा मारुती बनकर यांच्यासाठी नातू ज्योतीरादित्य बनकर याने माघार घेतली असून ही निवडणूक आजोबांबरोबर निरीक्षण करून अनुभव मिळवण्यासाठी आजोबांची सोबत राहणार आहे. मारुती बनकर हे यापूर्वी शेकाप पक्षाकडून दोन वेळा नगराध्यक्ष होते. तर सध्या ते भाजपकडून निवडणूक लढवत आहे. तर ज्योतिरादित्य 21 व्या वर्षी प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणार होते.
advertisement
नातवाने निवडणुकीतून घेतली माघार
मारुती बनकर आणि त्यांची नातू ज्योतिरादित्य बनकर हे सर्वाधिक वयाचा आणि सर्वात तरुण उमेदवार म्हणून सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेत असतात आजोबांसाठी नातवाने निवडणुकीतून माघार घेतली आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 21, 2025 8:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजोबांसाठी काय पण...सांगोल्यात नातवाने असं काही केलं की, अख्खं गावं म्हणालं लयं भारी


