मुलगी आई नको,आई नको म्हणून ओरडत राहिली, पण सैतान आईने डोक्यात पाटाच घातला; क्रूर घटनेनं महाराष्ट्र हादरला
- Reported by:Vijay Desai
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मृत मुलगी ही पाच भावंडांपैकी सर्वात मोठी असून तिचे वय अंदाजे 15 वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ठाणे : नालासोपारा पूर्वेतील विद्या विकास मंडळ चाळ, टांडा पाडा, संतोषभुवन परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अज्ञात कारणावरून एका आईने आपल्या अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत मुलगी ही पाच भावंडांपैकी सर्वात मोठी असून तिचे वय अंदाजे 15 वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 4 ते 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरात आई आणि मुलगी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले आणि आईने थेट आपल्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला.
लेकीच्या डोक्यात पाटा घातला
सुरुवातीला मुलीचा गळा चिरून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात वेगळेच सत्य समोर आले. आईने घरात असलेला पाटा डोक्यात घातला. डोक्यात जोरदार वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अतिरक्तस्त्रावामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे.
advertisement
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याविरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
advertisement
नालासोपारा पूर्व परिसरात एकच खळबळ
हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांकडून कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी सुरू असून शेजाऱ्यांकडूनही माहिती घेतली जात आहे. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव की अन्य काही कारणामुळे हा प्रकार घडला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या भीषण घटनेने नालासोपारा पूर्व परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 8:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलगी आई नको,आई नको म्हणून ओरडत राहिली, पण सैतान आईने डोक्यात पाटाच घातला; क्रूर घटनेनं महाराष्ट्र हादरला










